शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

लईराई जत्रोत्सव २०२६: आपत्ती व्यवस्थापनाकडून आदेश; स्टॉल्स, सुरक्षा व गर्दी नियंत्रणासाठी समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 06:54 IST

चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांची दखल घेत प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : शिरगाव येथील देवी लईराईच्या २१ रोजी होणाऱ्या वार्षिक जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कडक आदेश जारी केले आहेत. गर्दी नियंत्रण, सुरक्षा आणि स्टॉल्स व्यवस्थापन यावर विशेष भर देण्यात आला आहे.

गेल्यावर्षी जत्रोत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ६ जणांचा मृत्यू झाला होता. चेंगराचेंगरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने दिलेल्या सूचनांची दखल घेत प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. यामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

फक्त जत्रोत्सवात स्टॉल्स ठरवलेल्या विक्री क्षेत्रातच लावण्यास - परवानगी असेल. मुख्य रस्ते आणि मार्गावर कोणतेही अतिक्रमण होऊ देणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत यांना कोणत्याही स्टॉलला परवानगी देण्यापूर्वी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मंजुरी घेणे बंधनकारक असेल. स्टॉल्सच्या मांडणीसाठी आखलेले आराखडे आधीच सादर करणे आवश्यक राहील. विद्युत व अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक केले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईसह फौजदारी गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

विशेष उपसमिती नियुक्त

जत्रेच्या नियोजन आणि अंमलबजावणीसाठी एक विशेष उपसमिती नियुक्त करण्यात आली आहे. डिचोलीचे उपजिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. याशिवाय डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक, अग्निशमन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, वीज विभागाचे कार्यकारी अभियंता, देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रतिनिधी, शिरगाव पंचायत सचिव हे सदस्य, तर डिचोलीचे मामलेदार सदस्य सचिव आहेत. स्टॉल्सच्या प्रस्तावांची तपासणी करून त्यास मंजुरी देणे, जत्रा परिसरातील अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे, अनधिकृत स्टॉल्स हटविणे व १० एप्रिलपूर्वी अहवाल सादर करणे ही या समितीची जबाबदारी असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Lairai Jatrotsav 2026: Disaster Management Orders; Committee for Stalls, Security

Web Summary : Goa administration issues strict orders for Shirgaon's Lairai Jatrotsav following a deadly stampede last year. A special committee will oversee stall management, security, and crowd control, ensuring safety protocols are followed strictly to prevent future incidents.
टॅग्स :goaगोवाTempleमंदिरtempleमंदिरIndian Festivalsभारतीय उत्सव-सण