शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

समन्वयाचा अभाव ई-टॅबलेटच्या मुळावर

By admin | Updated: June 24, 2014 01:21 IST

संगीता नाईक ल्ल पणजी ई-टॅबलेटशी निगडित सरकारी बिगर सरकारी यंत्रणा आणि ई-टॅबलेट वापरणारे विद्यार्थी व शिक्षण संस्था यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गोव्यातील शिक्षण

संगीता नाईक ल्ल पणजी ई-टॅबलेटशी निगडित सरकारी बिगर सरकारी यंत्रणा आणि ई-टॅबलेट वापरणारे विद्यार्थी व शिक्षण संस्था यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे गोव्यातील शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविण्याची ताकद असलेल्या एका प्रभावी माध्यमाचा बोजवारा उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सायबर एज योजनेअंतर्गत पाचवी-सहावीतील विद्यार्थ्यांना गेल्या मार्च-एप्रिल महिन्यात दिलेल्या ई-टॅबलेटसंबंधी अनेक तक्रारी गोव्याभरातील बहुतेक शिक्षण संस्थांकडे आल्या आहेत. यातील बहुतेक तक्रारी ई-टॅबलेटवरील शैक्षणिक सॉफ्टवेअर संबंधी आहेत. हे सॉफ्टवेअर उघडण्यासाठी दिलेल्या ई-टॅब बटनवर क्लिक केले असता अनेक ई-टॅबलेटवर 'ए११ङ्म१ डूू४१ी िछङ्मू’ी उङ्मेीील्ल्रूं३्रल्लॅ ६्र३ँ छ्रूील्ल२्रल्लॅ २ी१५्रूी...' असा मॅसेज येतो. आमच्याकडे मुलांच्या ई-टॅबलेटसंबंधी अनेक तक्रारी आल्या आहेत. ऐन परीक्षेच्या दिवसांत शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या दिवसात घाईगडबडीत हे टॅबलेट्स दिल्यामुळे त्यांवरील सॉफ्टवेअर नीट चालते की नाही हे पाहिले गेले नसावे, असे मत शांतादुर्गा हायस्कूल बिचोलीचे मुख्याध्यापक सुरेश घाटवळ यांनी व्यक्त केले. सुट्टीमध्ये मुलांनी ई-टॅबलेटवर केलेल्या प्रयोगांमुळे आणि अयोग्य हाताळणीमुळेही अनेक समस्या निर्माण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. ई-टॅबलेटचा वापर गेम्ससारख्या बिगर शैक्षणिक कामांसाठी जास्त केल्याने हार्डवेअरमधील लहान-मोठे बिघाड, महत्त्वाची सॉफ्टवेअर मुलांकडून काढून टाकली जाणे यांसारख्या समस्याही निर्माण होत आहेत, असेही ते म्हणाले. काणकोणच्या कात्यायनी बाणेश्वर शाळेचे संगणक शिक्षक प्रसन्ना पागी यांनीही ए४ि३ुं हे सॉफ्टवेअर अनेक ई-टॅबलेट्सवर चालत नसल्याचे सांगितले. ई-टॅबलेट्स संबंधित सॉफ्टवेअर न चालण्यापासून ते अगदी स्क्रीन फुटण्यापर्यंतच्या अनेक तक्रारी आल्या आहेत, असेही ते म्हणाले. ई-टॅबलेटविषयक तक्रारींच्या निवारणासाठी एक दिवस निश्चित करून त्या दिवशी काणकोण एडीईआयच्या कार्यालयात सर्व तक्रारदारांना बोलावण्यात येईल, असे शाळेला सांगितले आहे. या पेक्षा प्रत्येक तालुक्यात एक ई-टॅबलेट सेवा केंद्र व कॉलसेंटर ठेवले तर त्यांचा निश्चितच जादा फायदा होईल. मुलांना नी पालकांना त्यांच्या सोयीनुसार तिथे जाऊन अथवा फोन करून आपल्या समस्यांचे निराकरण करणे सोपे होईल, असे पागी पुढे म्हणाले. पणजीतील आॅक्झिलियम हायस्कूलच्या अनेक मुलांच्या ई-टॅबवरच ए४ि३ुं रङ्मा३६ं१ी चालत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. माझ्या वर्गातील बहुतेक मुलांच्या ई-टॅबलेटवर ए४ि३ुं रङ्मा३६ं१ी चालत नाही; पण आमच्याकडे आले होते तसेच ते ई-टॅबलेट्स आम्ही तुम्हाला दिले आहेत. या उपर काही घालायची/काढायची जबाबदारी आमची नाही, असे आम्हाला शिक्षकांनी सांगितले आहे, असे या हायस्कूलच्या एका विद्यार्थिनीने नाव न घालण्याच्या अटीवर सांगितले. पणजीच्या मुष्टिफंड शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अपर्णा च्यारी यांनीही ई-टॅबलेट्समध्ये बिघाडाच्या तक्रारी आल्याचे नमूद केले. या तक्रारी आणि पाठनियोजनातील वापरासंबंधीच्या ट्रेनिंगचा अभाव या दोन कारणांमुळे इच्छा असूनही आम्ही हे प्रभावी साधन शिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये योग्यरीत्या समाविष्ट करून घेऊन शकत नाही, अशी खंतही त्यांनी प्रकट केली. कुडचडे परिसरातील एका शाळेतील मुख्याध्यापिकेने नाव न घालण्याच्या अटीवर सांगितले, आमच्या शाळेतही ई-टॅबलेटसंबंधी तक्रारी आहेत. केपे एडीइआयच्या आॅफिसमध्ये एक दिवस निश्चित करून मुलांच्या पालकांना ई-टॅबलेट दुरुस्तीसाठी बोलावले जाईल, असे खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. पन्नास-पन्नास मुले असणाऱ्या वर्गात ई-टॅबलेटमुळे आणखी प्रॉब्लेम नकोत म्हणून मुलांना ई-टॅबलेट घरीच ठेवून यायची ताकीद आम्ही दिली आहे, असेही त्या पुढे म्हणाल्या. शिक्षण खात्याचे संचालक अनिल पवार यांना याविषयी विचारले असता काही अपवाद वगळता खात्याकडे अशा तक्रारी आल्याच नसल्याचे त्यांनी सांगितले. या ई-टॅबलेटमध्ये बिघाड झाला तर काय करायचे, या संबंधीची मागदर्शक तत्त्वे आम्ही शाळांना दिली आहेत. ई-टॅबलेट पुरवणाऱ्या संस्था एक वर्षाच्या वॉरंटीच्या काळात या सर्व समस्यांचे निवारण विनामूल्य करणार आहेत, असेही पवार यांनी सांगितले. गोवा माहिती तंत्रज्ञान खात्याचे संचालक आणि ई-टॅबलेट वितरित करणाऱ्या कल्लाङ्म३ीूँ उङ्म१स्रङ्म१ं३्रङ्मल्ल ङ्मा ॠङ्मं (कळॠ) चे व्यवस्थापकीय संचालक नीलेश फळदेसाई यांनीही पवार यांच्या म्हणण्याला दुजोरा देताना सांगितले, ई-टॅबलेटवरील ए४ि३ुं व इतर ई-कंटेंटलाही एक वर्षाची वॉरंटी लागू आहे. मुलांना ई-टॅबलेट देतेवेळी त्यांच्या ई-टॅबलेट सप्लायरचे तसेच इतर आधार देणाऱ्या संस्थांचे फोन नंबर दिले गेले आहेत. ते वापरून ई-टॅबलेटधारक आपल्या तक्रारींचे निवारण करून घेवू शकतील. आयटीजीकडे अतिशय थोड्या तक्रारी आल्या होत्या आणि त्यांचे योग्य प्रकारे निवारण केले गेले. अजूनही कुणाच्या तक्रारी/समस्या असतील तर त्यांनी ई-टॅबलेट पुरवठादार किंवा त्यांचे सर्व्हिस सेंटर किंवा थेट आयटीजीकडे संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले.