शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कोलवाळ पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन, १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले

By काशिराम म्हांबरे | Updated: April 13, 2023 20:35 IST

म्हापसा: कोलवाळ पोलिसांनी काल गुरुवारी मुशिरवाडा येथेकोम्बिंग आॅपरेशन अंतर्ग भाडेकरू तपासणी मोहिम हाती घेतली. या मोहिमे दरम्यान पोलिसांनी १०१ व्यक्तींना ...

म्हापसा: कोलवाळ पोलिसांनी काल गुरुवारी मुशिरवाडा येथेकोम्बिंग आॅपरेशन अंतर्ग भाडेकरू तपासणी मोहिम हाती घेतली. या मोहिमे दरम्यान पोलिसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यातील ३९ व्यक्तींकडे कसल्याच प्रकारची कागदपत्रे नसल्याचे यावेळी त्यांना आढळून आले. अशा सर्व व्यक्तीवर सीआरपीसी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.  सर्वांना न्यायदंडाधिकाºयासमोर हजर करून नंतर सोडून देण्यात आले. घटनेनंतर कोलवाळ पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात दक्षता बाळगण्यास आरंभ केला असून पोलीस गस्तीतही वाढ केली आहे.  

काही महिन्यापूर्वी कोलवाळ पोलिसांकडून लाला की बस्ती यात अशाच प्रकारची मोहिम हाती घेतली होती.  त्यानंतर मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेली कोलवाळ पोलिसांची ही दुसरी मोहिम होती.  काल पहाटे ६ वाजल्या पासून उपअधिक्षक जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली तसेच निरीक्षक सोमनाथ माजिक  यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम हाती घेण्यात आली. त्यात त्यांच्या सोबत उपनिरीक्षक  मंदार नाईक, कुणाल नाईक, साहाय्यक उपनिरीक्षक रामचंद्र सावंत, संतोष आर्लेकर तसेच इतर कर्मचारी सहभागी झाले होते.

राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर इतर राज्यातून आवश्यक कागदपत्रे नसताना गोव्यात वास्तव करून राहणाºया तसेच विविध प्रकारच्या लहान मोठ्या गुन्ह्यात सहभागी असणाºयांची तपासणी करणे हा या मोहिमेचा उद्देश होता. या व्यक्तीतील बहुतांश व्यक्ती हे झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट, कर्नाटक, पश्चीम बंगाल सारख्या राज्यातील आहेत.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस