पोलीस खात्यात खांदेपालट
By Admin | Updated: July 1, 2015 00:54 IST2015-07-01T00:54:23+5:302015-07-01T00:54:54+5:30
पणजी : पोलीस दलात उपअधीक्षकांच्या बदल्या करून मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. खाण घोटाळाप्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीच्या उपअधीक्षक सुनिता सावंत यांची फोंडा येथे बदली करण्यात आली.

पोलीस खात्यात खांदेपालट
पणजी : पोलीस दलात उपअधीक्षकांच्या बदल्या करून मोठी खांदेपालट करण्यात आली आहे. खाण घोटाळाप्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीच्या उपअधीक्षक सुनिता सावंत यांची फोंडा येथे बदली करण्यात आली.
उपअधीक्षक मोहन नाईक यांना मडगावहून वास्को, दिनराज गोवेकर यांना फोंड्याहून मडगावला, लॉरेन्स डिसोझा यांना वास्कोहून पणजीला मुख्यालयात, गजानन प्रभुदेसाई यांना डिचोलीहून वाळपई पोलीस प्रशिक्षण केंद्रात, रमेश गावकर यांना मुख्यालयातून डिचोलीला, सुभाष गोलतेकर यांना केपेहून आयआरबीमध्ये, सॅमी तावारिस यांना गुन्हा शाखेतून केपेला, तर पोलीस निरीक्षक ब्रुतानो पाक्झिनो यांना पणजी सुरक्षा शाखेतून दाबोळी विमानतळावर पाठविण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
उपअधीक्षकांच्या बदल्या :
सुनिता सावंत फोंड्यात