शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
2
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
3
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
4
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
5
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
6
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
7
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
8
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
9
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
10
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
11
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
12
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
13
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
14
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
15
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
16
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
17
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
18
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
19
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल

ये जोडी नही... है संघर्ष की मिसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 20:39 IST

श्रीलंकेच्या ‘अनोख्या’ जोडीचा प्रेरणादायी प्रवास 

- सचिन कोरडे पणजी : प्रत्येकाला जीवनाच्या एका टप्प्यात संघर्षातून जावे लागते. जो या स्थितीत हिमतीने पुढे जातो तोच किमयागार ठरतो. आदर्श ठरतो. आपल्या आजूबाजूला अशा बऱ्याच गोष्टी घडतात, ज्यामधून इतरांना नवी ऊर्जा मिळते. अशीच ऊर्जा देणारी कहाणी गोव्यातील आयर्नमॅन स्पर्धेतून समोर आली.श्रीलंकेच्या अनोख्या जोडीची ही कहाणी अनेकांना चटका लावून गेली. अंध साथीदारासह अथांग सागरात पोहण्याचे आव्हान, न थांबता ९० किमी सायकलिंग आणि न थांबता २१ किमी धावण्याचे शिवधनुष्य जोडीने पेलेले. तेही एकजुटीने.  श्रीलंकन खालिद ओशमन (पूर्णपणे अंध) आणि मिथुन लियानेज (पूर्वी बहिरा होता) या दिव्यांग जोडीचं आयुष्य सामान्यांच्या कल्पनेपलीकडेचं आहे. प्रचंड मेहनती, पूर्ण सकारात्मकता यांच्या जोरावर ही जोडी नकारात्मतेवर मात करीत यशोशिखर गाठत आहेत. देशातील पहिल्या आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ही जोडी भारतात आली. त्यांनी ही स्पर्धा पूर्णही केली. पोडियममध्ये जेव्हा ही जोडी आली तेव्हा चाहत्यांनी नतमस्तक होत या जोडीचे स्वागत केले. तेव्हाचे वातावरण मनाला चटका लावून देणारे होते.पहाटे ६ वाजता ही जोडी समुद्रात उतरली. एकमेकांना बेल्ट बांधून जेव्हा ते पोहत होते, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. खाणाखुणांवर त्यांनी १.९ किमीचे अंतर पूर्ण केले. खालीद हा आंधळा असल्याने त्याला मिथुन सहकार्य करीत होता. त्याच्या इशाºयावर तो समुद्रात पोहत होता. या दोघांनी सायकलिंगही सोबत केले. तसेच धावण्याची शर्यतही पूर्ण केली. एकमेकांना बांधून धावत असलेली ही जोडी अनेकांचे लक्ष वेधून घेत होती.खालीदशी जेव्हा संवाद साधला तेव्हा तो म्हणाला, वयाच्या २६ व्या वर्षांपर्यंत मी ठीक होतो. मी २६ व्या वर्षीच माझ्या सर्व आशा गमावल्या. माझ्यासाठी जिणे अर्थहीन झाले होते. मी तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. २०११ मध्ये वैद्यकीय दुर्लक्षामुळे डोळे गमावले. चुलतभावाने मला समजावून सांगितले तेव्हा माझ्यातील क्रीडापटूचा प्रवास सुरू झाला. माझी प्रकृती सध्या खूप चांगली आहे. मी तीन वेळा आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली आहे. खालीद ३५ वर्षांचा आहे. त्याने श्रीलंका क्रिकेट संघाचेही प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने मिथुन (३३) सोबत १.९ किमी स्विमिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी धावण्याची शर्यतही पूर्ण केली. यासाठी त्यांनी ६ तास ४५ मिनिटांचा वेळ दिला.मिथुन म्हणाला की, ओशमनचा जोडीदार असल्याचा मला अभिमान आहे. त्याच्याकडून मी खूप काही शिकलो. तो प्रत्येक दिवशी सराव करतो. तो नोकरीसुद्धा करतो. उत्तम जलतरणपटू असून त्याने श्रीलंकेत अनेकांना प्रेरणा दिली आहे.