शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रीय संगीत संस्कृतीचे प्रमुख अंग; उदय शेवडे यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 14:07 IST

केरीत 'स्वरवर्षाव' शास्त्रीय संगीत संमेलनाचे थाटात उद्घाटन.

लोकमत न्यूज नेटवर्क, सावईवेरे : शास्त्रीय संगीत हे भारतीय संस्कृतीचे एक अभूतपूर्व असे अंग आहे. ते अतिशय समृद्ध व उच्च दर्जाचे संगीत असून, आध्यात्मिक साधना व मोक्ष प्राप्तीचे साधन म्हणून शास्त्रीय संगीताकडे पाहिले जाते, असे प्रतिपादन संस्कार भारतीच्या कोकण व गोवा प्रांतचे संघटनमंत्री उदय शेवडे यांनी केले.

पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांना समर्पित 'स्वरवर्षाव' या नवव्या शास्त्रीय संगीत संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. केरी फोंडा येथील -विजयादुर्गा देवस्थान व विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळातर्फे कला आणि संस्कृती संचालनालय गोवा सरकार यांच्या सहकार्याने हे संमेलन आयोजित केले आहे. विजयादुर्गा संस्थानच्या सभामंडपात झालेल्या या सोहळ्यास व्यासपीठावर विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मनोहर देसाई, सत्कारमूर्ती भजनी कलाकार बाबूराव भांडीये, देवस्थानचे कोषाध्यक्ष विलास जठार, मंडळाचे उपाध्यक्ष योगेश गोब्रे, कार्यक्रमाचे समन्वयक मनोज आमशेकर उपस्थित होते.

श्री. शेवडे म्हणाले की, आपल्या भारत देशावर पूर्वी झालेल्या अनेक आक्रमणांच्या काळातदेखील संगीतावर प्रभाव झालेला आहे. शास्त्रीय संगीताची वेदांपासून परंपरा असून, अनेक वाद्यांमधून संगीताची निर्मिती झालेली आहे. माणसांचे दिव्यत्व हे कलेच्या माध्यमातून पद्धतशीरपणे प्रकट होऊ शकते. शास्त्रीय संगीताच्या माध्यमातून एकाग्रता, शिस्त, नम्रता, सेवाभाव अशा अनेक चांगल्या गुणांची जोपासना, निर्मिती व संस्कार आपल्यावर होत असतात. गुरुकुल पद्धत, कुटुंब व्यवस्था व भारतीय कला या तीन गोष्टींमुळे आपले स्वत्व व सत्व हे कायम टिकून आहे.

शास्त्रीय संगीताचे महत्त्व

सर्वप्रथम कार्यक्रमाचे समन्वयक मनोज आमशेकर यांनी प्रास्ताविकातून शास्त्रीय संगीताचे महत्त्व उदहरणासहित विशद केले. पाहुण्यांची ओळख मनोहर देसाई यांनी करून दिली. यानंतर उदय शेवडे यांच्या हस्ते ज्येष्ठ भजनी कलाकार व शिक्षक बाबूराव भांडीये यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. सुभाष जाण यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी उदय शेवडे यांचाही सन्मान करण्यात आला. सूत्रनिवेदन उर्वी देसाई यांनी केले, तर मंडळाचे उपाध्यक्ष योगेश गोब्रे यांनी आभार मानले.

 

टॅग्स :goaगोवाmusicसंगीत