शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

कर्नाटकमुळे म्हादई नदीतील पाण्याची पातळी खालावली, मुख्यमंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 19:38 IST

pramod sawant : कर्नाटक जोपर्यंत पाणी गोव्यात सोडत नाही, तोपर्यंत कर्नाटकशी आम्ही म्हादईप्रश्नी कसलीच बोलणी करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले

ठळक मुद्देम्हादईचा जो प्रवाह कर्नाटकने वळविला तो प्रवाह अगोदर गोव्यात सोडा, मग चर्चेविषयी पाहू अशी गोव्याची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

पणजी : म्हादई नदीतील पाण्याची गोव्याच्या बाजूने पातळी कमी झालेली आहे. कर्नाटकने पाणी वळविल्याने असे घडले आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. कर्नाटक जोपर्यंत पाणी गोव्यात सोडत नाही, तोपर्यंत कर्नाटकशी आम्ही म्हादईप्रश्नी कसलीच बोलणी करणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

कर्नाटकने म्हादई नदीचे पाणी वळविले व त्यामुळे गोव्यात पाण्याची पातळी कमी झाली हे आपण भाजपचे गोवा प्रभारी असलेले कर्नाटकचे आमदार सी. टी. रवी यांनाही सांगितले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी येथे पत्रकारांना सांगितले. कर्नाटकने अवमान केला आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयात  यापूर्वीच अवमान याचिका सादर केली असून त्यावर आम्ही ठाम आहोत.

कर्नाटकशी आम्हाला न्यायालयाच्या कक्षेबाहेर जाऊन कोणतीच चर्चा करायची नाही. आपल्याला कर्नाटकमधील नुकतीच एक व्यक्ती भेटली तेव्हा त्या व्यक्तीसोबतही आपण म्हादईविषयी काहीच चर्चा केली नाही. म्हादईचा जो प्रवाह कर्नाटकने वळविला तो प्रवाह अगोदर गोव्यात सोडा, मग चर्चेविषयी पाहू अशी गोव्याची भूमिका असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दुधसागरवरही परिणाममगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी म्हादईची पाण्याची पातळी गोव्यात घटल्याचे दीड वर्षापूर्वीच सांगून तशी छायाचित्रेही सादर केली होती. कर्नाटकच्या योजनेमुळे यापुढे दुधसागर धबधबाही बंद होईल, असे ढवळीकर यांनी शुक्रवारी सांगितले. पातळी घटली हे सरकार आता दीड वर्षाने मान्य करते असे ढवळीकर म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत