शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

कर्नाटकचे मुख्यमंत्री 16-17 सप्टेंबर रोजी गोव्यात, म्हादईप्रश्नी चर्चेस इच्छुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 19:58 IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे 16 किंवा 17 रोजी गोवा भेटीवर येणार आहेत.

पणजी - म्हादई पाणीप्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा हे गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी खूप इच्छुक झाले आहेत. येत्या 16 किंवा 17 रोजी येडीयुरप्पा गोवा भेटीवर येणार आहेत. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून पाणीप्रश्नी ते चर्चा करतील. स्वत: येडीयुरप्पा यांनी याविषयीचे विधान मंगळवारी बंगळुरूमध्ये केले व त्यामुळे गोव्यात चिंता व्यक्त होऊ लागली आहे.म्हादई पाणीप्रश्नी पाणी तंटा लवादाने यापूर्वी निवाडा दिला आहे. तो निवाडा कर्नाटकला मान्य नाही. यामुळे विषय सर्वोच्च न्यायलायत पोहचला आहे. कर्नाटकने निवाडय़ाविषयी लवादाकडेही काही स्पष्टीकरणो मागितली आहेत. तथापि, केंद्रीय खाण मंत्री तथा कर्नाटकचे एक नेते प्रल्हाद जोशी हे सोमवारी गोव्यात होते. त्यांनी म्हादईप्रश्नी गोवा व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून तोडगा काढावा असे म्हटले होते. जोशी यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही सोमवारी भेट घेतली होती.या सगळ्य़ा पार्श्वभूमीवर येडीयुरप्पा मंगळवारी म्हादईप्रनी बोलले. आपल्या कार्यालयाने मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. आपल्याला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत म्हादई पाणीप्रश्नी बोलायचे आहे, असे येडीयुरप्पा म्हणाले. म्हादई नदीचा एक प्रवाह काही प्रमाणात महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमधूनही जातो. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नुकतेच भेटून म्हादईप्रनी बोललो आहे. येत्या 16 व 17 रोजी गोव्याला भेट देण्याचा माझा विचार आहे.दरम्यान, म्हादई पाणीप्रश्नी कर्नाटकशी चर्चा करू नये, कारण लवादाने अगोदरच निवाडा दिला आहे, अशी अनेक गोमंतकीयांची भूमिका आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही पुन्हा मंगळवारी अशीच भूमिका मांडली. गोव्याचे मुख्यमंत्री सावंत हे गोव्याच्या हिताच्यादृष्टीने वागतील अशी आपण आशा ठेवतो, असे कामत म्हणाले. लवादाने अगोदरच निवाडा दिल्याने आता चर्चेला वावच नाही, असे कामत म्हणाले.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnatakकर्नाटकgoaगोवा