पणजी : लुईस बर्जर लाच प्रकरणात माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार दिगंबर कामत यांचा अटकपूर्व जामीन रद्द करावा, यासाठी क्राईम ब्रँचने दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावली आहे. कामत यांच्यासाठी हा मोठा दिलासा ठरला असून त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न करणारे पोलीस या निवाड्याने तोंडघशी पडले आहेत. कामत यांना अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणारे पोलीस सलग दुसऱ्यांदा अपयशी ठरले आहेत. विशेष न्यायालयाचा कामत यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करणारा आदेश उचलून धरताना न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांनी पोलिसांना चपराक दिली आहे. पोलिसांच्या आव्हान याचिकेला (पान २ वर)
कामतांचा जामीन कायम
By admin | Updated: October 17, 2015 02:08 IST