शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीही गेली, भरपाईही नाही!; वेदांताच्या कर्मचाऱ्यांची न्यायासाठी हाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 22:34 IST

खाणी बंद झाल्यानंतर खाण कंपन्यांकडून कुणाला काढले नसल्याचे यापूर्वी सरकारने म्हटले असले, तरी वेदांता कंपनीकडून बार्जवरील १९० कर्मचा-यांना ब्रेक दिल्यामुळे त्यांना घरी बसणे भाग पडले आहे. या कर्मचा-यांनी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. 

पणजी: खाणी बंद झाल्यानंतर खाण कंपन्यांकडून कुणाला काढले नसल्याचे यापूर्वी सरकारने म्हटले असले, तरी वेदांता कंपनीकडून बार्जवरील १९० कर्मचा-यांना ब्रेक दिल्यामुळे त्यांना घरी बसणे भाग पडले आहे. या कर्मचा-यांनी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे. वेदांता कंपनीच्या मेसर्स मॅकारोनी शीप मेनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून १९० पेक्षा अधिक कर्मचा-यांना कामावर ब्रेक दिला आहे. या १९० कर्मचा-यात ९० हून अधिक गोमंतकीय आहेत तर इतर केरळ व महाराष्ट्रातील आहेत. हे कर्मचारी पूर्वी मेसर्स आय पी मरीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड खाली कामाला होते. त्यानंतर जुलै २०१७ पासून त्यांना मेसर्स मॅकारोनी शीप मेनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे कर्मचारी म्हणून नेमणुका करण्यात आल्या. त्यानंतर जानेवारी व फेब्रुवारी  २०१८ मध्ये या कर्मचा-यांना ब्रेक देण्यात आला. त्यानंतर त्यांना पुन्हा कामावर घेण्यात आलेले नाही. त्यामुळे मागील ५ ते ६ महिने त्यांन रोजगार नाही. तसेच कंपनीकडून त्यांना भरपाईही दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्यावर आभाळ कोसळले आहे. या कर्मचा-यांशी कंपनीने केलेल्या २०१२ मधील करारानुसार कर्मचा-यांच्या नेमणुका या कंत्राटी नसून कायम तत्वावर असल्याचा कर्मचा-यांचा दावा आहे. तसेच नियमित बोनस व इतर सुविधांत्यांना दिल्या जातील असे करारात आहे असे त्यांनी म्हटले आहे. असे असताना त्यांना अचानक ब्रेक देण्यात येतो आणि कामावरून काढल्याची नोटीसही दिली जात नाही आणि कामावरही बोलावले जात नाही अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. या कर्मचा-यांकडून कंपनीला अनेक पत्रे लिहून त्यांना कामावर घेण्याच्या विनवण्याही केल्या आहेत, परंतु त्याचा काहीच परिणाम झालेला नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही त्यांनी दोन पत्रे लिहिली आहेत. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन त्यांचा गेलेला रोजगार मिळवून द्यावा अशी विनंती त्यांना केली  आहे. पहिल्या पत्राला प्रतिसाद न मिळाल्यामुळे स्मरणपत्रही पाठविण्यात आले आहे. अद्याप त्यांना कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही.  एक तर त्यांचा गेलेला रोजगार पुन्हा मिळवून द्यावा किंवा त्यांना योग्य भरपाई तरी द्यावी अशी त्यांची मागणी आहे.

टॅग्स :goaगोवा