जनमत कौलाला होता जनसंघाचा विरोध! माणिकराव ठाकरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2024 08:48 AM2024-01-17T08:48:54+5:302024-01-17T08:50:31+5:30

नेहरूंनी गोव्याचे वेगळेपण जपले; ओपिनियन पोलदिनी काँग्रेसचे मडगाव येथे शक्तिप्रदर्शन

janamat was opposed to the jana sangh said manikrao thackeray | जनमत कौलाला होता जनसंघाचा विरोध! माणिकराव ठाकरे 

जनमत कौलाला होता जनसंघाचा विरोध! माणिकराव ठाकरे 

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कॉंग्रेस पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. भाजपने आतापर्यंत धर्माच्या नावाने लोकांना आपसात लढवायचे व सत्ता मिळवायची हाच उद्योग केला आहे. गोव्याचे वेगळे अस्तित्व कायम रहावे यासाठी पंडित नेहरु व अन्य काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्याचवेळी लोकसभेत गोव्यातील नियोजित जनमत कौलाला जनसंघाच्या खासदाराने विरोध केला होता, अशीसा दावा काँग्रेसचेगोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी केला.

कॉंग्रेसतर्फे काल, मंगळवारी येथील लोहिया मैदानावर अस्मिताय दिनानिमित्त सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना आश्वासने देणे व त्याकडे पाठ वळविणे हेच त्या पक्षाचे काम असल्याचे सांगितले. 

काँग्रेस पक्ष सोडून अनेकजण गेले मात्र जनता आमच्याबरोबर आहे. १९५२ मध्ये देशात पहिली लोकसभा निवडणूक झाली. त्यावेळी अनेक पक्षांनी उमेदवार उभे केले होते. काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष त्यावेळीही होता व आजही आहे. पंडित नेहरु यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने त्यावेळी लोकसभेच्या ८० टक्के जागा जिंकल्या होत्या, याची आठवणही त्यांनी करुन दिली.

खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी आजच हा दिवस महत्वाचा असल्याचे सांगितले. भाजप धर्मामध्ये फूट घालते, फोडा व सत्ता करा, हेच त्यांचे धोरण आहे. त्यामुळेच आपले गोंयकारपण धोक्यात आले आहे. यावेळी आमदार कार्लस फेरेरा, आमदार एल्टन डिकॉस्टा, उपाध्यक्ष एम. के. शेख, माजी आमदार राधाराव ग्राशियस, एलिना साल्ढाना, कायत सिल्वा, अॅड, रमाकांत खलप व इतर नेते उपस्थित होते.

गोव्यातील जमीन, नैसर्गिक स्रोत जतन करुन ठेवणे, तामानारसह म्हादईचे संरक्षण करणे, युवकांना रोजगाराची हमी तसेच भाजप सरकारच्या कॅश फॉर जॉबचा पदार्फश करणे, ज्या गोवेकरांचा जन्म १९६१ पूर्वी झाला आहे व त्याचे वारसदारांना दुहेरी नागरिकत्व मिळवून देणे, दाबोळी विमानतळ बंद न करणे, अनुसूचित जमातीना गोवा राज्य विधानसभा निवडणुकीत राजकीय आरक्षणाबाबत लढा देणे आदी उराय घेण्यात आले.

सत्ताधारी संघाच्या इशाऱ्यावर

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले, गोव्याची ओळख अबाधित रहावी यासाठी पंडित नेहरू व कॉग्रेसने नेहमी प्रवल केले आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे संघाच्या इशाऱ्यावर नाचत असून राज्यात द्वेष परसवण्याला त्यांचा पाठींबा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

सरकारने राज्याला कर्जबाजारी केलेय

विरोधी पक्षनेते ग्ररी आलेमाव यांनी जनमत कॉल ही गोवेकरांना देवाने दिलेली भेट आहे. हा मार्ग कॉंग्रेस व नेहरु यांनी दिला. आम्ही आजचा हा दिवस संपूर्ण राज्य साजरा करण्याची मागणी केली होती, मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. गोव्याची सध्या प्रत्येक ठिकाणी पिछेहाट होत आहे. या राज्यावर ३५ हजार कोटींचे कर्ज आहे. सरकार नोकऱ्या विकतो. केवळ सोहळे करण्यातच त्यांना रुची असल्याची टीकाही त्यांनी केली.

 

Web Title: janamat was opposed to the jana sangh said manikrao thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.