शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही चाचणीविषयी चर्चा आवश्यक- काब्राल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 17:23 IST

एचआयव्ही चाचणी सक्तीविषयी सर्वागाने समाजात चर्चा घडून येणो आवश्यक आहे, असे मत कायदा खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

पणजी : एचआयव्ही चाचणी सक्तीविषयी सर्वागाने समाजात चर्चा घडून येणो आवश्यक आहे, असे मत कायदा खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्याकडील कायदा खाते काढून मुख्यमंत्र्यांनी ते खाते निलेश काब्राल यांच्याकडे सोपवले आहे. काब्राल यांच्याकडे दुस ऱ्यांदा कायदा खाते आले. मात्र विश्वजित यांच्याकडे कायदा खाते असताना मंत्री राणे यांनी विवाह नोंदणीवेळी गोव्यात एचआयव्ही रक्त चाचणी सक्तीची केली जाईल असे जाहीर केले होते. त्यासाठी कायदा दुरुस्ती करू, असेही राणे म्हणाले होते. विवाह नोंदणी ही कायदा खात्याच्या अखत्यारित येते. त्यामुळे काब्राल यांना याविषयी विचारले असता, काब्राल म्हणाले की खरे म्हणजे एचएआयव्हीच्या या विषयाबाबत मला जास्त काही बोलायचे नाही, कारण एचआयव्हीची एखाद्याला लागण झालेली असणो किंवा नसणो हा व्यक्तीगत विषय आहे. सक्तीची भाषा करण्यापूर्वी समाजात सर्वबाजूने त्याविषयी चर्चा व्हायला हवी. विवाह ही देखील प्रत्येकाची व्यक्तीगत गोष्ट आहे. जर दोन व्यक्तींना एकामेकांशी लग्न होणो मान्य असेल व त्यांच्या कुटुंबांनाही ते मान्य असेल तर मग आम्ही सरकार या नात्याने विवाह नोंदणी कशी काय थांबवू शकतो असा प्रश्न येतो. तरीही या विषयाबाबत अगोदर चर्चा होऊ द्या. तत्पूर्वीच आम्ही पाऊले उचलू शकणार नाही.कायदा खाते पुन्हा मिळाल्याने तुम्ही समाधानी आहात काय असे विचारले असता, मंत्री काब्राल म्हणाले, की समाधानाचा प्रश्न नाही. मी कायदा मंत्री असताना काही सुधारणा सुरू केल्या होत्या, त्या आता पूर्ण करता येईल. माझ्याकडे कोणतेच खाते नसेल किंवा मंत्रीपद नसेल व मी फक्त माङया मतदारसंघाचाच आमदार असेन, तेव्हा देखील मी काम करत राहीन. मी असमाधानी असणार नाही.

टॅग्स :HIV-AIDSएड्सgoaगोवाHealthआरोग्य