शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक विकासाबरोबरच परंपरा जपणे गरजेचे: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 07:58 IST

मये महोत्सवाचा थाटात समारोप

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : चौफेर विकासाची गरुडझेप घेत असतानाच विकासाबरोबरच आपल्या परंपरा, संस्कृती, गावदेखील तितक्याच आत्मीयतेने जपणे गरजेचे आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली संस्कृती नव्या पिढीने जपावी यासाठी ग्रामीण भागातून मये महोत्सवासारखे महोत्सव हे उत्तम माध्यम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मये येथे केले.

रायझिंग युथ मये, कला आणि संस्कृती खाते, विजयानंद ज्ञान प्रसारक संस्था व महामाया हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्यातर्फे आयोजित दोनदिवसीय तिसऱ्या मये महोत्सव समारोप सोहळ्यास मुख्यमंत्री सावंत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ. पूर्णानंद चारी, स्वागत अध्यक्ष दयानंद कारबोटकर, माजी आमदार धर्मा चोडणकर, डॉ. स्नेहा भागवत, आयोजन समितीचे अध्यक्ष रूपेश ठाणेकर, कमलाकांत तारी, विविध पंचायतीचे सरपंच, सदस्य उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हभप शिवलीला पाटील (कीर्तनकार), शुभदा गावकर, सीताराम सावंत, कमलावती चोडणकर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. पूर्णानंद च्यारी, धर्मा चोडणकर, डॉ. स्नेहा भागवत, दया कारबोटकर यांनी विचार मांडले. रूपेश ठाणेकर यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. यावेळी शिवलीला पाटील यांनी कीर्तन सादर केले.

शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन करावे

आपली लोकगीते, लोककला, धालो गीत या जुन्या परंपरा, गीते आहेत त्या गीतांचे संवर्धन करण्यासाठी नव्या पिढीने विशेष योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन लाभण्याची गरज आहे, काही शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवत नसल्याने त्यांचे भवितव्य रखडते व चुकीच्या मार्गाने गेल्याने त्याचा जीवनावरही परिणाम होतो. शिक्षकांनी याचे भान ठेवून योग्य मार्गदर्शन करावे. तरुणांनी गोव्याची दिशा ठरवावी त्यासाठी आत्मनिर्भर होत असताना केवळ नोकरीमागे न लागता रोजगार निर्माण करणारा युवक व्हावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, आज रोजगार कंत्राटदार व इतर क्षेत्रांत परप्रांतीयांचा भरणा दिसत आहे. या प्रत्येक क्षेत्रात गोमंतकीय युवक पुढे यावा हा आपला ध्यास आहे.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत