शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

आयरिश प्रकरणाचा 15 डिसेंबर रोजी होणार निवाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 23:10 IST

पणजी: महिलेची बदनामी प्रकरणात अ‍ॅड आयरीश रॉड्रिगीश यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर पणजी सत्र न्यायालय १५ रोजी निवाडा सुनावणार आहे.

पणजी: महिलेची बदनामी प्रकरणात अ‍ॅड आयरीश रॉड्रिगीश यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर पणजी सत्र न्यायालय १५ रोजी निवाडा सुनावणार आहे. या प्रकरणात उभय पक्षांचे युक्तिवाद सोमवारी पूर्ण झाले. महिलेची बदनामी प्रकरणात क्राईम ब्रँचकडून दुसरा समन्स बजावल्यानंतर आयरीश यांनी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता.वास्तविक त्याच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा हा जामीनपात्र असतानाही त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी धाव घेतली होती. आयरीश यांच्या अर्जानंतर न्यायालयाने क्राईम ब्रँचला नोटीस पाठविली होती. क्राईम ब्रँचने नोटिसीला प्रतिसाद देताना आयरीश हे तपासाला सहकार्य करीत नसल्याचे म्हटले होते. त्याच्यावर ज्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ती कलमे जामीनपात्र आहेत. त्यामुळे अटकपूर्व जामीन देण्याची गरज नाही असे क्राईम ब्रँचचे म्हणणे आहे.आयरीश यांच्यावर जामीनपात्र कलमाअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आलेला असला तरी क्राईम ब्रँच त्यात अतिरिक्त कलमे जोडू शकतात अशी भिती आयरीश यांना आहे. त्यामुळेच अटकपूर्व जामीनसाठी त्यांनी अर्ज केला आहे. तूर्त जामीनपात्र कलमे लावण्यात आली असली तरी त्यात अतिरिक्त कलमे जोडली जाणार नाहीत याची ग्वाही क्राईम ब्रँचकडे मागण्यात आली होती. परंतु ती देण्यास क्राईम ब्रँचने नकार दिला. आतापर्यंतच्या तपासातील निष्कर्शात तरी त्यांच्यावर अतिरिक्त कलम लावण्याची गरज भासलेली नाही असे क्राईम ब्रँचचे म्हमणे आहे.शिवोली येथील एका महिलेल्या विरोधात अश्लील प्रचार करण्याच्या प्रकरणात आणि सोशल मीडियावर फोटो प्रसिद्ध करण्याचा प्रकरणात आयरीश विरुद्ध हणजूण पोलीस स्थानकात नोंदविण्यात अलेला गुन्हा क्राईम ब्रँचला हस्तांतरीत करण्यात आला होता. या प्रकरणात क्राईम ब्रँचचे निरीक्षक दत्तगुरू सावंत हे तपास करीत असून त्यांनी बुधवारीच त्यांना समन्स पाठवून चौकशीला हजर राहण्यास सांगितले होते.

टॅग्स :goaगोवाCourtन्यायालय