शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

स्वीडीश युवकाच्या 'त्या' दोन साथीदारांचा शोध, काणकोण पोलिसांकडून जयपुरात चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 18:29 IST

फेलिक्स दहाल या फिनीश वंशीय स्वीडीश युवकाचा गुढ मृत्यू गोवा पोलिसांसाठी एक आव्हान बनले असून फेलिक्सने आपल्या दोन मित्रांकडे जयपूर येथे केलेल्या जमीनीच्या कथित व्यवहाराचा तपास आता काणकोण पोलिसांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देफेलिक्स दहाल या स्वीडीश युवकाचा गुढ मृत्यू अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद काणकोण पोलिसांकडून जयपुरात चौकशी

-  सुशांत कुंकळयेकर

मडगाव : फेलिक्स दहाल या फिनीश वंशीय स्वीडीश युवकाचा गुढ मृत्यू गोवा पोलिसांसाठी एक आव्हान बनले असून फेलिक्सने आपल्या दोन मित्रांकडे जयपूर येथे केलेल्या जमीनीच्या कथित व्यवहाराचा तपास आता काणकोण पोलिसांकडून केला जात आहे. फेलिक्सच्या मृत्यूपूर्वी त्याच्याबरोबर गोव्यात असलेल्या सन अविस्कार या कॅनेडियन व झियान द जानेरो या राजस्थानातील युवकांच्या पोलीस शोधात आहेत. आॅक्टोबर २०१४ मध्ये गोव्यात आलेल्या या २२ वर्षीय स्वीडीश युवकाचा मृतदेह २८ जानेवारी २०१५ रोजी पाटणे काणकोण येथील रस्त्यावर सापडला होता. काणकोण पोलिसांनी सुरूवातीला हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले होते. मात्र फेलिक्सची आई मीना पीरहोनेन हीने गोव्यातील न्यायालयात हे प्रकरण लावून धरल्याने न्यायालयाच्या निर्देशानुसार २०१६ मध्ये काणकोण पोलिसांनी या प्रकरणात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला होता. हा गुन्हा नोंद होऊन वर्ष उलटले तरीही पोलिसांकडून फारसा तपास झालेला नाही, असा दावा करून पीरहोनेन यानी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पीठाकडे धाव घेत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली असून विदेशी व्यक्तींच्या मृत्यूच्या तपासणीबद्दल तपास यंत्रणाना मार्गदर्शक तत्वेही घालून द्यावीत अशी मागणी या याचिकेत केली आहे.ही याचिका मुंबई उच्च न्यायालयासमोर सुनावणीस आली असता त्या दोन संशयित युवकांचा अजुनही पोलिसांना शोध लागलेला नाही असे काणकोण पोलिसांनी न्यायालयाला कळवले आहे. मयताचे फोन डिटेल्स् यापुर्वीच पोलिसांनी मिळविले असून त्या दृष्टिकोनातून तपास चालू आहे़ या डिटेल्स्ची छाननी चालू असल्याचे काणकोणचे पोलीस निरिक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी न्यायालयात सादर केलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे़आतापर्यंत जो तपशील समोर आला आहे. त्याप्रमाणे विदेशात गे-स्ट्रीपर म्हणून काम करणा-या सन अविस्कार या कॅनेडियन युवकाबरोबर फेलिक्स गोव्यात आला होता. सननेच त्याची गाठ झियान द जानेरो याच्याकडे घालून दिली होती. त्यानंतर ते तिघेही गोव्याहुन जयपुरला रवाना झाले होते.  जयपुरमध्ये असलेल्या एका अपार्टमेंटची विक्री करण्याचा त्या तिघांनी प्लॅन केला होता. या विक्रीतून येणा-या फायद्यातील १५ टक्के वाटा फेलिक्सला द्यायचे त्यावेळी कबूल केले होते. फेलिक्सने आपल्या या मित्रांना त्यावेळी २९०० युरोचे भांडवलही दिले होते. त्यानंतर पुन्हा गोव्यात ते तिघेही आले असता लवकरच फेलिक्सचा मृतदेह सापडला होता. या अपार्टमेंट विक्रीच्या वादातूनच हा खून झाला असावा असा फेलिक्सच्या आईने दावा केला होता.या संबंधी काणकोणचे पोलिस निरिक्षक प्रभुदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता, जयपुरात कुठल्याही विदेशी व्यक्तीने जमीन किंवा मालमत्ते संदर्भात व्यवहार केले आहेत का या बद्दलचा तपशील आम्ही तेथील जमीन नोंदणी कार्यालयाकडे मागितला होता. मात्र त्या संदर्भात आम्हाला फारशी माहिती मिळू शकली नाही, असे त्यांनी सांगितले़ 

टॅग्स :goaगोवाMurderखून