शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट पणजीतील गटारांमध्ये इंटरनेट केबल्सचे अडथळे; मॉन्सूनपूर्व कामे ठरली फ्लॉप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 14:47 IST

महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे पणजीकडे खास लक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे.

पणजी: स्मार्ट सिटीच्या बेशिस्त कामांमुळे पणजीत अनेक महत्वाच्या ठिकाणी गेल्या दोन दिवसात पडलेल्या पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे पणजीतील अनेक गटारांमध्ये इंटरनेट सेवा देण्यासाठी वापरण्यात येणारे केबल्स आढळले असून, सदर केबल्स गटारातून पाणी योग्य प्रकारे वाहण्यास अडथळ ठरत आहे. यावरुन महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे पणजीकडे खास लक्ष नसल्याचे स्पष्ट होत आहे.

आल्तीनो येथील वीज खात्याच्या कार्यालयासमोरील गटरांमधून पाणी थेट रस्त्यावर वाहत होते. स्थानिकांच्या तक्रारीनंतर नगरसेवक अस्मीता केरकर यांनी मनपाचे कामगार बोलवून या गटराचे काम हाती घेतले, दरम्यान त्यांना या गटरांमध्ये मोठ्या प्रमाणात असलेले खासगी इंटरनेेट केबल्स आढळून आले. या केबल्समुळे या गटरात माती व कचरा साचला होता. परीणामस्वरुप गटारातून पाणी थेट रस्त्यावर वाहत होते. केबल्स आढळून येताच केरकर यांनी महापौर रोहीत मोन्सेरात व उपमहापौर संजीव नाईक यांना याची कल्पना दिली.

महपौर रोहीत मोन्सेरात यांनी उपमहापौर संजीव नाईक यांच्यासमवेत या भागाची पाहणी केली. तसेच ज्या गटारांमध्ये असे इंटरनेट केबल्स सापडतात, ते केबल्स थेट काढून बाहेर फेकण्यात यावे, असे आदेश दिला. तसेच इतर गटारांंमधील स्वच्छतेचेे काम त्वरीत हाती घ्यावे, असेही मोन्सेरात यांनी यावेळी कामगारांना बजावले.

 मॉन्सूनपूर्व कामे ठरली फ्लॉप पावसाळी हंगाम सुरु होण्या तीन महिने आधीच महानगरपालीका पणजीतील मॉन्सूनपूर्व कामे हाती घेतात. या अंतर्गत गटारे साफ करणे, धोकादायक झाडे-फांद्या कापणे, नाले साफ करणे, सांतिनेझ खाडी साफ करणे, धोकादायक उघडी गटारे बंद करणे, यासारखी कामे हाती घेण्यात येतात. परंतु रविवारपासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने मॉन्सूनपूर्व कामाचा बोगस कारभार उघड्यावर पाडला आहे. जवळपास सर्व मॉन्सूनपूर्व कामे फ्लॉप ठरली.

टॅग्स :goaगोवा