शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

इन्सुलेटेड ट्रकऐवजी गोव्यात आता चक्क प्रवासी बसमधून मासळीची आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 17:25 IST

पणजी -मडगावात स्थानिक विक्रेत्यांनी मासळी पकडली; गोवा आणि महाराष्ट्रातील विक्रेत्यांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता

 

सुशांत कुंकळयेकरमडगाव - मासळीवरील फॉर्मेलीनच्या वादामुळे गोव्यातील मत्स्यउद्योग ऐन पर्यटन मौसमात ठप्प झालेलाअसताना आता बस व ट्रेन या प्रवासी वाहनांनी गोव्यात बाहेरच्या राज्यातून मासळी येऊ लागल्याने गोव्यातील मासे उद्योगातील उद्योजकांमध्ये पुन्हा संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजुने इन्सुलेटेड वाहनांतून मासळीची वाहतूक केली जात नाही म्हणून गोवा सरकारने महाराष्ट्र व कर्नाटकातून येणाऱ्या मासळीवर निर्बंध घातलेले असतानाच आता प्रवासी वाहनांतून माशांची आयात होऊ लागल्याने ही बंदीही कुचकामी ठरली आहे. मात्र, अशा वाहतूकीमुळे गोव्यातील विक्रेते आणि परराज्यांतील विक्रेते यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शनिवारी मडगावच्या मासे विक्रेत्यांनी पणजी व म्हापसा या दोन ठिकाणी बसमधून महाराष्ट्रातून पाठविलेल्या मासळीच्या पेटय़ा पकडून राज्य सरकारची ही बंदी कशाप्रकारे कुचकामी ठरली आहे. हे दाखवून दिले. शुक्रवारी याच विक्रेत्यांनी मडगावातही अशाचप्रकारे कारवारहून आलेली मासळी मडगावच्या कदंब बसस्थानकावर पकडली होती. तर गुरुवारी मडगावच्याच कोकण रेल्वे स्थानकावर कारवारहून रेल्वेतून पाठविलेली मासळी भरुन घेऊन जाणाऱ्या तीन रिक्षा पकडल्या होत्या. जर इन्सुलेटेड वाहनांशिवाय गोव्यात परराज्यांतून मासळी आणता कामा नये अशी राज्य सरकारची भूमिका आहे तर ही मासळी कशी येते असा सवाल मडगाव घाऊक मासे विक्रेते संघाचे सदस्य जबीर शेख यांनी केला आहे.मासळी विक्रेत्यांच्या दाव्याप्रमाणे अजूनही महाराष्ट्र व कर्नाटकांतून मोठय़ा प्रमाणावर गोव्यात मासळीची अशा अवैधरित्या निर्यात केली जाते. शनिवारी या मासे विक्रेत्यांनी पणजीजवळ असलेल्या मेरशी जंक्शनवर बसमधून पाठविलेल्या माशांच्या सहा पेटय़ा पकडल्या असता त्यात इसवण (किंग फिश) व प्रॉन्स सापडल्याचा दावा विक्रेत्यांनी केला असून केवळ सहाच पेटय़ा आम्हाला पकडण्यात यश आले. मात्र प्रत्यक्षात ब:याच मोठय़ा प्रमाणावर हा माल गोव्यात आल्याचा दावा शेख यांनी केला. दरम्यान, फॉर्मेलिनच्या प्रकरणावर यशस्वी तोडगा काढण्यासाठी गोवा सरकारला यश न आल्याने गोव्याच्या प्रमुख उद्योगांपैकी एक असलेल्या मत्स्योद्योगावर विपरित परिणाम झाला असून ऐन पर्यटन मौसमात माशांची विक्री पन्नास टक्क्यांनी खाली उतरल्याचा दावा घाऊक मासे विक्रेते संघाचे अध्यक्ष मौलाना इब्राहीम यांनी केला असून याचा फटका केवळ गोव्यालाच बसलेला आहे असे नसून कोंकणातील मालवण व देवगड येथील मत्स्योद्योगावरही विपरित परिणाम झाला आहे. याच पाश्र्र्वभूमीवर इन्सुलेटेड वाहनांतून मासळीची वाहतूक करण्यासाठी एका महिन्याचा अवधी द्यावा अशी मागणी महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर यांनी गोव्याचे आरोग्य व एफडीए खाते सांभाळणारे मंत्री विश्र्वजीत राणो यांच्याकडे केली होती. मात्र गोवा सरकार आपल्या म्हणण्यावर ठाम राहिल्याने हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :goaगोवाFishermanमच्छीमार