शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात ड्रग्ज डिलर व्हेली डिकॉस्ताला कुठ्ठाळीत अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 19:41 IST

मागची कित्येक वर्षे बिनबोभाटपणे दक्षिण गोव्यात ड्रग्सचा व्यवहार करणारा कुख्यात आरोपी व्हेली डिकॉस्ता याला गुरुवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास अंमलीपदार्थ प्रतिबंधक (एएनसी) पोलीस विभागाने सापळा रचून कुठ्ठाळी येथे अटक केली.

मडगाव : मागची कित्येक वर्षे बिनबोभाटपणे दक्षिण गोव्यात ड्रग्सचा व्यवहार करणारा कुख्यात आरोपी व्हेली डिकॉस्ता याला गुरुवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास अंमलीपदार्थ प्रतिबंधक (एएनसी) पोलीस विभागाने सापळा रचून कुठ्ठाळी येथे अटक केली. या विभागाचे पोलीस अधीक्षक उमेश गावकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, यावेळी आरोपीकडे चरस व गांजा असा एकूण 4.85 लाखांचा माल सापडला.व्हेली डिकॉस्ता हा तिळामळ-केपे येथे राहात होता. आपल्या घरातूनच तो ड्रग्सचा व्यवसाय चालवित असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे मागचे दोन महिने एएनसीचे पोलीस त्याच्या मागावर होते. बुधवारी रात्री व्हेली कुठ्ठाळी येथे डिल करणार अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून ठेवला. मध्यरात्री आपल्या महिंद्रा एसयूव्ही या गाडीने कुठ्ठाळी फेरी धक्क्यावर संशयित आला असता पोलिसांनी त्याला जेरबंद केले. त्याच्याकडून दीड किलो चरस आणि 1.180 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला. अधीक्षक गावकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, संशयित ड्रग्सच्या व्यवसायात आहे, याची पोलिसांना कुणकुण होती. अशातच त्याने एक महिन्यापूर्वीच नवीन गाडी घेतल्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला होता. त्यामुळेच पोलिसांनी सापळा रचून एक बनावट ग्राहकातर्फे व्हेलीकडे डिल केले, त्यातच व्हेली अडकला.व्हेली अडकल्याने आता केपे, कुडचडे परिसरात काहीजणांचे धाबे दणाणले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केल्यास कित्येकजण अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्हेली आपल्या गँगच्याद्वारे हा व्यवसाय चालवत होता आणि ड्रग्सच्या त्याच्या या विळख्यात केपे, कुडचडे परिसरातील कित्येक युवक आणि विद्यार्थी आले होते. यापूर्वी याच व्हेलीला पोलिसांनी 2010 साली आपल्याच आत्याच्या घरी दरोडा घालण्याच्या प्रकरणात अटक केली होती. त्याशिवाय त्याला रस्त्यावरील वाटमारी प्रकरणातही अटक करण्यात आली होती. कुख्यात दरोडेखोर मायकल फर्नाडिस याच्याशीही व्हेलीचा संबंध होता.

टॅग्स :Arrestअटक