शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ४४५ कोटींच्या उद्योगांना मंजुरी, ८०० तरुणांना मिळणार नोकरीची संधी!; मुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:24 IST

गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने दिला हिरवा कंदील

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या काल, बुधवारी झालेल्या ४१व्या बैठकीत ४४५ कोटींच्या उद्योगांना मंजुरी देण्यात आली असून याद्वारे ८०० जणांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, आमदार तसेच आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. 

मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर पान माहिती देताना सांगितले की, अन्नप्रक्रिया, लॉजिस्टिक्स व वेअरहाउसिंग आणि उत्पादन क्षेत्रातील एकूण १० नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. ही मंजुरी राज्य सरकारच्या शाश्वत औद्योगिक वाढ, संतुलित प्रादेशिक विकास आणि रोजगार निर्मिती या धोरणाला बळकटी देणारी आहे. उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनिक प्रक्रिया सुलभ करणे, विविध खात्यांमधील समन्वय वाढवणे आणि पारदर्शक व गुंतवणूकदारांना अनुकूल वातावरण तयार करण्यावर सरकार भर देत असल्याचे सावंत यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, थिवी, पिसुर्ले व धारबांदोडा आदी सरकारी आद्योगिक वसाहतींमध्ये हे प्रकल्प येणार आहेत. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये सरकारने २१७.२५ कोटी रुपये गुंतवणुकीच्या दहा प्रकल्पांना मंजुरी दिली होती. हे प्रकल्प आयटी, लॉजिस्टिक्स व उत्पादन क्षेत्रातील होते व त्यातून ९४१ जणांना नोकऱ्या मिळणार होत्या. प्राप्त माहितीनुसार वेदांता कंपनीच्या तब्बल ७२२ कोटींच्या पाइप उत्पादन तसेच १५०० कोटींच्या फायबर प्रकल्पासह अन्य काही मोठ्या प्रकल्पांसाठी विशेष सवलतीचा विचार सरकार करत आहे.

सर्वांगीण विकासाला गती

गोव्यातील उद्योगाभिमुख वातावरण अधिक सक्षम करण्यासाठी इज ऑफ डुइंग बिझनेस सुधारण्याच्या दिशेने सातत्याने पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. जबाबदार गुंतवणूक आकर्षित करून राज्याच्या आर्थिक वाढीस चालना देणे, युवकांसाठी रोजगार निर्माण करणे आणि गोव्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa Approves ₹445 Crore Investments, 800 Jobs Created: CM

Web Summary : Goa approves ₹445 crore investment in 10 projects across food processing, logistics and manufacturing. Creating 800 jobs, these projects will boost industrial growth and employment. The government aims to create investor-friendly environment.
टॅग्स :goaगोवाjobनोकरीState Governmentराज्य सरकार