शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादला जाणाऱ्या विमानाचे दाबोळी विमानतळावर इमरजन्सी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 19:25 IST

१८० प्रवाशांना गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून अहमदाबाद घेऊन जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

वास्को - 180 प्रवाशांना गोव्याच्या दाबोळी विमानतळावरून अहमदाबाद घेऊन जाण्यासाठी उड्डाण घेतलेल्या इंडिगो एअरलाइन्स विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड झाल्याने ह्या विमानाला सुरक्षेच्या दृष्टीने पुन्हा दाबोळी विमानतळावर ‘इमरजन्सी लँडिंग’ (आकस्मिक उतरवावे) करावे लागले. हे विमान रत्नागिरी, महाराष्ट्र क्षेत्रात पोचले असता विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड होत असल्याचे संकेत वैमानिकांना मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित दाबोळी विमानतळावरील ‘एटीसी’ विभागाला संपर्क करून नंतर सदर विमान सुरक्षितरीत्या येथे उतरविले.दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.15) संध्याकाळी 4 च्या सुमारास ही घटना घडली. 3.50 वाजता दाबोळी विमानतळावरून इंडिगो एअरलाइंन्स चे ‘6 इ 162’ विमान 180 प्रवाशांना घेऊन अहमदाबाद, गुजरात जाण्यासाठी रवाना झाले. विमान उड्डाणाच्या काळात रत्नागिरी भागात पोचले असता विमानाच्या इंजिनात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याचे संकेत वैमानिकाला मिळाले. विमानात निर्माण झालेल्या बिघाडामुळे यात असलेल्या 180 प्रवाशांना तसेच विमानातील कर्मचाऱ्यांना धोका निर्माण न व्हावा यासाठी वैमानिकाने त्वरित दाबोळी विमानतळावरील ‘एटीसी’ विभागाला याबाबत माहीती दिली. सदर विमानाला त्वरित पुन्हा दाबोळी विमानतळावर इमरजन्सी लँडिंग करावे लागणार असल्याची माहिती वैमानिकाने दिली. यानुसार दाबोळी विमानतळावर सर्व प्रकारच्या सुरक्षेची पावले घेऊन जर काही आपतकालीन घटना घडल्यास त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी व इतर सुरक्षा यंत्रणांनी त्वरित उड्डाणपट्टीच्या क्षेत्रात उपस्थिती लावून ते सज्ज झाले. सुरक्षेची पावले दाबोळी विमानतळावर घेतल्यानंतर वैमानिकाला हे विमान दाबोळी विमानतळावर इमरजेंन्सी उतरवण्यासाठी परवानगी दिली.ह्या विमानाच्या वैमानिकाने नंतर रत्नागिरी भागातून त्वरित वळण घेतल्यानंतर 4.45 वाजता विमानाची दाबोळी विमानतळावर इमरजन्सी लँडिंग केली. सदर विमानातील प्रवासी तसेच कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी दिली. दरम्यान ह्या विमानाच्या इंजिनात काय तांत्रिक बिघाड झालेला आहे याबाबतची तपासणी इंडीगो विमानाच्या अभियंत्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी उपलब्ध केली आहे. विमानात निर्माण झालेला तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर हे विमान 180  प्रवाशांना घेऊन दाबोळी विमानतळावरून अहमदाबाद जाण्यासाठी रवाना होणार आहे.

टॅग्स :goaगोवाairplaneविमान