शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ओसीआय कार्डसाठी आता भारतीय, पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे, केंद्र सरकारने गोव्याची मागणी केली मान्य

By किशोर कुबल | Updated: April 21, 2024 14:50 IST

Goa News: ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे आहे , असे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केल्याने तो पोर्तुगीज नागरिकत्त्व स्वीकारलेल्या गोमंतकीयांसाठी फार मोठा दिलासा ठरला आहे.

- किशोर कुबल  पणजी - ओसीआय कार्डसाठी भारतीयपासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे आहे , असे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट केल्याने तो पोर्तुगीज नागरिकत्त्व स्वीकारलेल्या गोमंतकीयांसाठी फार मोठा दिलासा ठरला आहे.

ओसीआय कार्डासाठी अर्ज करताना पर्यायी दस्तऐवज म्हणून भारतीयपासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र जोडता येईल. पोर्तुगीज नागरिकत्त्व स्वीकारलेल्या गोमंतकीयांसाठी फार मोठी अडचण निर्माण झाली होती. गोवा सरकारने हा विषय केंद्र सरकारकडे नेऊन तोडगा काढण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यासह केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांची भेट घेऊन पासपोर्ट आणि ओसीआय कार्डसंदर्भातील गोमंतकीयांचा प्रश्न सोडवण्याची मागणी काही महिन्यांपूर्वी केली होती.

पासपोर्ट जमा केल्यानंतर ओसीआय कार्ड मिळविण्यात गोमंतकीयांना अडचणी येत आहेत. या अडचणींतून गोमंतकीय नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली होती. पोर्तुगालात जन्मनोंदणी झाली म्हणून भारतीय पासपोर्ट परराष्ट्र मंत्रालयाने रद्द करू नये, अशी मागणी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनीही राज्यसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती. दक्षिण गोव्याचे कॉग्रेसचे मावळते खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी यावर लोकसभेत आवाज उठवला होता.

पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी असल्यामुळे भारतीय पासपोर्ट रद्द करण्याचे प्रकार गोव्यात झाले आहेत. याचा अनेक गोमंतकीयांना फटका बसला आहे.  पोर्तुगालात जन्म नोंदणी झाली म्हणून सुमारे ७० जणांचे पासपोर्ट रद्द केलेले आहेत. विदेशी नागरिकाला भारतीय पासपोर्ट मिळत नाही. त्यामुळे त्याचा पासपोर्ट रद्द होतो.

टॅग्स :goaगोवाpassportपासपोर्टIndiaभारत