शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय उद्योग महासंघाचा राष्ट्रीय जलमार्गांना पाठिंबा; दळण-वळणाचे गोवा बनेल हब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 19:03 IST

राज्यात सहा नद्यांना केंद्र सरकारकडून राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला गेला असून, ते स्वागतार्ह आहे. या जलमार्गाचा वापर सुरू झाल्यास इतर वाहतुकीचा खर्च वाचणार असून, या सेवेची अत्यंत गरज आहे. त्याचबरोबर राज्याने आपले पुरवठा धोरणही लवकर निश्चित करावे, अशी मागणी भारतीय उद्योग महासंघाने(सीआयआय) शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. 

पणजी : राज्यात सहा नद्यांना केंद्र सरकारकडून राष्ट्रीय जलमार्गाचा दर्जा दिला गेला असून, ते स्वागतार्ह आहे. या जलमार्गाचा वापर सुरू झाल्यास इतर वाहतुकीचा खर्च वाचणार असून, या सेवेची अत्यंत गरज आहे. त्याचबरोबर राज्याने आपले पुरवठा धोरणही लवकर निश्चित करावे, अशी मागणी भारतीय उद्योग महासंघाने(सीआयआय) शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली. या परिषदेस सीआयआयचे राज्य आयुक्त अत्रेय सावंत, संयोजक अँथनी गास्केल, सदस्य अतुल जाधव आणि रोशन कुमार हे उपस्थित होते. याप्रसंगी गास्केल म्हणाले की, जुलै महिन्यात सीआयआयने उद्योगांना पुरक सुविधा (लॉजिस्टिक्स) धोरणावर परिषद घेतली होती. त्यात पुरवठय़ासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर विचारमंथन झाले होते. त्यावेळी या परिषदेत सहभागी झालेल्या लोकांनी पायाभूत विकास तथा सुविधा निर्माण करण्याच्या विषयावर एकमत दर्शविले होते. पायाभूत सुविधा निर्माण करताना रस्ते, रेल्वे वाहतुकीबरोबरच राष्ट्रीय जलमार्गाचा वापर होणो आवश्यक असल्याचे परिषदेला वाटते. त्यामुळे राष्ट्रीय जलमार्ग झाल्यास समुद्राकाठी आणि नदीकाठी उभारल्या जाणा:या जेटींमुळे त्या परिसराचा विकास होणार मोठी गुंतवणूक त्यात होणार आहे. तसेच समुद्र पर्यटन वाढ होण्याबरोबरच हॉटेल व्यवसायांनाही ते पूरक ठरणार आहे. या मार्गामुळे रोजगार निर्मितीही होणार असल्याने ग्रामपंचायतींनी त्याला विरोध करू नये. 

राज्य दळण-वळणाचे हब बनेल!राष्ट्रीय जलमार्गाची सुविधा निर्माण झाली तर गोवा हे दळण-वळणाचे हब बनेल. नद्यांवर सरकारचा हक्क असून, ती काही खासगी मालमत्ता नाही. त्यामुळे जलमार्गाना विरोध करणो चुकीचे आहे. सागरमाला ही योजनासुद्धा राष्ट्रीय जलमार्गासाठी उपयुक्त ठरणार आहे. केंद्र सरकार या कामासाठी संपूर्ण निधीची तरतूद करीत असल्याने राज्य सरकारचे केवळ त्यावर लक्ष राहणार आहे. कार्गोसाठी (मालवाहू जहाज) लागणारी सर्व सुविधा जलमार्गासाठी उभारण्यात येणा:या जेटीवर असणार आहे. त्याचबरोबर या जेटींचा बाज्रेसनाही उपयोग करता येऊ शकतो. 

टॅग्स :goaगोवा