शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

खवळलेल्या समुद्रातून आर्मी अधिका-याची चित्तथरारक सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 19:44 IST

गोव्यातील फेसाळता समुद्र पहाताना दगडावरुन पाय घसरुन पाण्यात पडलेले लेफ्टनंट शिवम या 26 वर्षीय आर्मी अधिका-याला शेवटी तटरक्षक दलाच्या हॅलीकॉप्टरच्या सहाय्याने वाचविण्यात आले.

 मडगाव - गोव्यातील फेसाळता समुद्र पहाताना दगडावरुन पाय घसरुन पाण्यात पडलेले लेफ्टनंट शिवम या 26 वर्षीय आर्मी अधिका-याला शेवटी तटरक्षक दलाच्या हॅलीकॉप्टरच्या सहाय्याने वाचविण्यात आले. सदर अधिकारी मूळ अंबाला-हरियाणा येथील असून पुण्यात त्याचे पोस्टींग करण्यात आले होते. पुण्यातून तो गोव्यात आला असता गुरुवारी दुपारी ही दुर्घटना काब द राम येथे घडली.गोवा तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक हिमांशु नौटीयाल यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या दुर्घटनेत हा अधिकारी काहीसा जखमी झाल्यामुळे त्याला तातडीने वास्कोतील नौदलाच्या जीवंती  रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. तटरक्षक दलाच्या या धाडसी मोहिमेत लेफ्ट. कर्नल ऋषी शर्मा (पायलट) व डेप्यूटी कमाडंट विश्व जीत सिंग यांनी मोलाची कामगिरी बजावली. हेलिकॉप्टरमधून पाण्यात दोर सोडून या अधिका:याला वर काढण्यात आले.

मिळालेल्या माहितीप्रमाणे, दुपारी एकच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. सध्या वादळी हवामानामुळे दर्या खवळलेला असून काब द राम येथे मोठय़ा लाटा उसळत होत्या. पर्यटकांनी समुद्रावर जाऊ नये असा इशारा दिलेला असतानाही सदर अधिकारी या किना-यावरील दगडावर चढला. यावेळी पाय घसरल्याने तो पाण्यात पडला.त्याला वाचविण्यासाठी किना-यावरील जीवरक्षक जवानांनी जेटस्की पाण्यात घालण्याचा प्रयत्न केला मात्र सगळी जागा खडकाळ असल्यामुळे आणि जोराच्या लाटा येत असल्यामुळे हा प्रयत्न सोडून देण्यात आला. सुरक्षेचा उपाय म्हणून वरिष्ठ जीवरक्षक अमिताव याने रेस्क्यू टय़ूब पाण्यात सोडला आणि त्यावर चढण्याचा आदेश त्याला दिला. त्यानंतर लगेच तटरक्षक दलाशी तसेच कुंकळ्ळी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.तटरक्षक दलाला या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शोधासाठी चेतक हॅलिकॉप्टर तातडीने पाठविले. ढगाळ वातावरण आणि कमी प्रकाश असतानाही ते हेलिकॉप्टर तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तत्काळ हॅलिकॉप्टरमधून पाण्यात दोर सोडून खवळलेल्या दर्यातून त्याची सुटका केली. 

टॅग्स :goaगोवाIndian Armyभारतीय जवान