शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव कंत्राटावरून विरोधक आक्रमक खर्चासंबंधीच्या वित्तसमितीची मंजुरी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2018 22:25 IST

खर्चासंबंधीच्या वित्तीय समितीची परवानगी न घेताच गोवा पायाभूत साधन सुविधा महामंडळाच्या मेरशी येथील न्यायालय इमारत प्रकल्पाच्या कंत्राट खर्चात ५१ कोटी रुपये अतिरिक्त वाढ करण्याच्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. 

पणजी - खर्चासंबंधीच्या वित्तीय समितीची परवानगी न घेताच गोवा पायाभूत साधन सुविधा महामंडळाच्या मेरशी येथील न्यायालय इमारत प्रकल्पाच्या कंत्राट खर्चात ५१ कोटी रुपये अतिरिक्त वाढ करण्याच्या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.  सुरूवातीला सार्वजनिक बांधकाम खात्याचा हा प्रकल्प ५७ कोटी रुपयांचा होता. नंतर साधन सुविधा महामंडळाकडे हा प्रकल्प सुपूर्द करण्यात अला तेव्हा १७ हजार चौरस मीटर जागेत  खर्चाचा अंदाज ९२ कोटी रुपये करण्यात आला होता व त्यासाठी कंत्राटही जारी करण्यात आले होते. परंतु त्या कंत्राटात नंतर पुन्हा दुरुस्ती करून १७ हजार चौरस मिटरवरून ३२ हजार चौरस मीटर जागेत इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार इमारतीच्या आराखड्यात बदल करण्यात आल्यानंतर खर्चाचा अंदाज १४३.१७ कोटी रुपये करण्यात आला. खर्चासबंधीच्या वित्तीय समितीची मंजुरी न घेता या वाढिव खर्चाचे कंत्राट जारी करण्यात आल्याची कबुली  सरकारपक्षाची धुरा सांबाळणारे सुदिन ढवळीकर यांनी  दिली. परंतु हा प्रकल्प न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू असल्यामुळे वित्तीय समितीची मंजूरी न घेताच कंत्राट जारी करण्यात अल्याचे सांगितले. या स्पष्टीकरणाने समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सरकारवर हल्ला चढविला. योग्य नियोजन न करताच कंत्राटे का दिली जात आहेत असा प्रस्न अलेक्स रेजिनाल्ड यांनी विचारला. कोट्यवधी रुपये खर्च करून आणलेले सरकारचे सल्लागार काय काम करीत आहेत असेही त्यांनी विचारले. न्यायालयाच्या देखरेखीखाली प्रकल्पाचे काम केल्यास वित्तीय समितीची मंजुरी लागत नाही काय असा प्रश्न लुईझीन फालेरो यांनी केला. तसे न्यायालाने सांगितले होते काय असेही त्यांनी विचारले. हे गैरप्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात विरोधक सरकारला कोंडीत पकडणार असे वाटत असतानाच प्रश्नोत्तराचा तास संपला.  हा प्रश्न आमदार रवी नाईक यांनी उपस्थित केला होता.

टॅग्स :goaगोवाnewsबातम्या