शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
3
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
4
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
5
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
6
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
7
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
8
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
9
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
10
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
11
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
12
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
13
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
14
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
16
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
17
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
18
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
19
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
20
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'

गोव्यात ऑनलाइन सेक्स रॅकेटच्या प्रकारात होतेय वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2017 15:17 IST

गोव्यात ऑनलाइन सेक्स रॅकेटचे प्रकार वाढत चालले आहेत. पोलिसांना गंडवण्यासाठी या अवैध व्यवसायातील दलालांनी नवीन प्रकारची रणनीती आखली आहे.

म्हापसा : गोव्यात ऑनलाइन सेक्स रॅकेटचे प्रकार वाढत चालले आहेत. पोलिसांना गंडवण्यासाठी या अवैध व्यवसायातील दलालांनी नवीन प्रकारची रणनीती आखली आहे. व्यवसाय जरी गोव्यात सुरू असला तरी तो चालवणारे दलाल मात्र मुंबई, दिल्लीसारख्या शहरांतून हा व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने बिनबोभाटपणे चालवतात. परदेशातील मुलींचासुद्धा यात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मागील काही दिवसात कळंगुट तसेच हणजूण पोलिसांनी ब-याच ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यात पकडण्यात आलेल्या दलालांकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाइन सेक्स रॅकेट चालवण्यासाठी संकेतस्थळावर मुलींची माहिती पुरवण्यात येत असते. देण्यात आलेल्या मोबाइलवर एकदाच कॉल करुन प्रतिसाद दिला जात नाही. त्यासाठी ब-याचवेळा प्रयत्न करावे लागतात. संपर्क साधल्यानंतर पुढील संपर्कासाठीचे माध्यम म्हणून व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. 

सुरुवातीला संपर्क साधणा-या ग्राहकाला त्याच्या पत्त्यासहीत ओळखपत्र तसेच काहीवेळा आधारकार्डाची प्रत सुद्धा पुरवणे भाग पाडले जाते. नंतर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे गुगल लोकेशन मागवले जाते. ग्राहकाकडून पुरवण्यात आलेल्या माहितीची दलालांकडून खात्री करुन घेतली जाते. त्यानंतर दलालांची माणसे ग्राहक असलेल्या ठिकाणी जाऊन त्याला न कळता त्याची पडताळणी करुन घेतात. आलेले ग्राहक धोका देणारे नसल्याची खात्री झाल्यावर पुढील डील निश्चित केली जाते. डील करताना ग्राहकाला देशी मुली पाहिजे की विदेशी हेसुद्धा ठरवले जाते. त्यावरुन डीलची रक्कम निश्चित केली जाते. डील पक्की झाली असली तरी ग्राहकाला कुठल्या हॉटेलात मुली पुरवण्यात येतील यावर शेवटच्या क्षणापर्यंत बरीच गुप्तता पाळली जाते. काहीवेळा शेवटच्या क्षणापर्यंत हॉटेल्ससुद्धा बदलली जातात. ज्या हॉटेलात मुली पाठवल्या जातात त्या ठिकाणातील परिसरावर करडी नजर ठेवली जाते. पुरवण्यात येत असलेल्या मुलींची ग्राहकाबरोबरची वेळ सुद्धा ठरवली जाते. ग्राहकाला मुली पुरवण्यापूर्वी त्याच्याकडून आगाऊ रक्कम घेतली जाते. ब-याचवेळी पूर्ण रक्कम ग्राहकाकडून घेतल्यानंतर मुली पुरवल्या जातात. परदेशी युवती पुरवण्यासाठीची रक्कम ५० हजारापर्यंत तर देशी युवतींसाठी किमान ३० हजार रुपयापर्यंतच्या रक्कमेवर ठरवले जाते.  पुरवण्यात येत असलेल्या मुलींना दलाल स्वत: त्यांचा चालक बनवून मुली पुरवतो. काही वेळा भाड्याने घेतलेल्या वाहनांचा किंवा दुस-या व्यक्तीकडून अल्पकाळाच्या वापरासाठी घेतलेल्या गाड्यांचासुद्धा वापर केला जातो. ठरलेला वेळ मुलींनी ग्राहकासोबत घालवल्यानंतर त्यांना आणलेल्या गाडीतून माघारी नेले जाते. ग्राहकाकडून आगाऊ रक्कम घेतल्यानंतर राहिलेली रक्कम वजा करुन ती मुलींजवळ दिली जाते.

ज्या ठिकाणावरुन ऑनलाईन पद्धतीने हा व्यवहार केला जातो त्या ठिकाणावरुन या होत असलेल्या अनैतिक व्यवहारावर व्यवहार पूर्ण होईपर्यंत पूर्णपणे लक्ष ठेवले जाते. पोलिसांना चकमा देण्यासाठी सर्व खबरदारी बाळगली जाते. त्यातून एखाद्या क्षणी धोका होणार असे वाटल्यास झालेली डील रद्द करण्याचे सुद्धा प्रकार घडले आहेत. या संबंधी बोलताना कळंगुटचे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी सांगितले. पोलिसांना चकवण्यासाठी दलालांनी कितीही प्रयत्न केले जरी पोलिसांच्या कटाक्ष नजरेतून ते सुटणे बरेच कठीण असते. असे प्रकार घडू नये यासाठी तेवढी खबरदारी सुद्धा बाळगली जाते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे बरेच प्रकार उघडीस सुद्धा आले आहेत. त्यामुळे अशा प्रकारांवर नियंत्रण आले आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हा