शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात येणा-या रशियन पर्यटकांच्या संख्येत वाढ, तीन महिन्यात तब्बल 61,153 पर्यटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 16:14 IST

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा गोव्यात येणा-या देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत 30 टक्क्यांनी घट झाल्याचा दावा पर्यटन व्यावसायिकांकडून होत असला तरी यंदाचे रशियन पर्यटकांचे गोव्यात येण्याचे प्रमाण मागच्या वर्षापेक्षा जास्त आहे.

मडगाव : मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा गोव्यात येणा-या देशी-विदेशी पर्यटकांच्या संख्येत 30 टक्क्यांनी घट झाल्याचा दावा पर्यटन व्यावसायिकांकडून होत असला तरी यंदाचे रशियन पर्यटकांचे गोव्यात येण्याचे प्रमाण मागच्या वर्षापेक्षा जास्त आहे. मागच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर या दोन महिन्यात तब्बल 125 चार्टर्ड फ्लाईट्समधून 32,938 रशियन आले होते. यंदा या दोन महिन्यात गोव्यात येणा-या रशियन चार्टर्ड फ्लाईट्सची संख्या 173 वर पोचली असून या दोन महिन्यांच्या कालावधीत एकूण 47,743 रशियन गोव्यात आले आहेत.गोवा पर्यटन महामंडळाकडून ही अधिकृत माहिती प्राप्त झाली आहे. यंदा डिसेंबर 1 ते 13 या कालावधीत रशियाहून 51 विमाने गोव्यात आली असून एकूण 13,410 पर्यटक त्यामधून गोव्यात आले आहेत. रशियन पर्यटकांसाठी गोवा हे सर्वात अधिक पसंतीचे स्थळ असून प्रत्येकवर्षी गोव्यात येणा-या विदेशी पर्यटकांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त प्रमाण रशियनांचेच असते. त्यामुळे गोव्यातील किनारपट्टीत इंग्लिशप्रमाणे रशियन भाषेचीही चलती असून कित्येक शॉक्समधील बोर्ड आवर्जून रशियन भाषेत लिहिलेले असतात. गोव्यात प्रत्येक किना-यावर यामुळे रशियन भाषा स्थानिकांमध्येही परिचित झालेली आहे.गोवा पर्यटन खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान एकूण 77,871 विदेशी पर्यटकांचे चार्टर्ड विमानांतून गोव्यात आगमन झाले आहे. त्यापैकी 61,153 पर्यटक रशियातून आले आहेत त्यापाठोपाठ ब्रिटीश पर्यटकांचा नंबर लागतो. ब्रिटनमधून यंदा पहिल्या तीन महिन्यात 12,625 पर्यटक आले आहेत. फिनलँडमधून आलेल्या 11 चार्टर्ड फ्लाईट्समधून 1,921 फिनिश पर्यटक गोव्यात आले आहेत. तर 1,990 पर्यटक कझाकिस्तानमधून गोव्यात आले आहेत. यंदा सर्वात कमी पर्यटक इराणमधून गोव्यात आले असून आतार्पयत तीन  फ्लाईट्समधून 92 पर्यटकांनी या देशातून गोव्यात आगमन केले आहे.

टॅग्स :goaगोवा