शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

संततधार पावसाने सासष्टीला झोडपले; वाहतुकीमध्ये अडथळे, अनेक भागात रस्ते पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 10:40 IST

कुंकळ्ळीसह ठिकठिकाणी पडझडीच्या घटना.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगावः गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने सासष्टी तालुक्याला झोडपून काढले. मडगाव शहराचाही त्यात समावेश आहे. नावेली, कुंकळ्ळी व इतर ठिकाणी झाडांच्या पडझडीमुळे मार्गावर अडचणी निर्माण झाल्या. बरेच रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करीत मार्ग काढावा लागला. राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम बगल रस्त्यावरील कामात सखल शेतजमिनीत मातीचे भराव टाकल्याने मंगूलपासून, पेडा-बाणावली ते खारेबांदच्या भागात सदृश पूरस्थिती निर्माण झाली.

वेर्णापासून पश्चिम बगल राष्ट्रीय महामार्ग सुरू होतो, नुवेपासून माडेल, मुगल, पेडा-सुरावली, बाणावली ते खारेबादहून हा मार्ग नेण्यात येत आहे. माडेल येथे स्टील्ट पूल उभारण्यात येत असला, तरी मार्गाच्या कामासाठी सखल शेतजमिनीत मातीचे भराव टाकल्याने त्या भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगूलपासून पेडा बाणावली व खारेबांद भागात पश्चिम बगल राष्ट्रीय महामार्गासाठी शेतजमिनीत मातीचे भराव टाकल्याने खारेबांद भागात रस्ताच पाण्याखाली गेला आहे. रस्त्यांवरील झाडांच्या पडझडीमुळे झालेले अडथळे अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी जाऊन हटविले. लोकांना मार्ग मोकळे करून दिले.

गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली होती. काल रात्री पुष्कळ पाऊस पडला. रविवारी सकाळी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. नंतर नऊ ते अकरा दोन तास पावसाने काही काळ उसंत दिली होती, त्यानंतर सुरू झालेला पाऊस संध्याकाळी ४ वाजेपर्यंत संततधारपणे कोसळत होता. त्यानंतर ५ वाजेपासून सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत कोसळत होता.

दरम्यान, या पावसाने अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे अग्निशमन दलाला बरीच धावाधाव करावी लागल्याचे दिसून आले.

मार्केटमध्ये शुकशुकाट

रविवारी सुटीचा दिवस असल्याने धो-धो कोसळणाया पावसाचा शहरी भागात जनजीवनावर फारसा परिणाम झाला नाही. पावसामुळे मार्केट परिसरातही शुकशुकाट होता. पण, संततधार पावसामुळे शेतीत जास्त पाणी वाढल्यामुळे शेतात काम करणाऱ्या कामगारांवर किरकोळ परिणाम झाला. शेतात पावसाचे जास्त पाणी भरल्याने काम करणे अवघड होऊन गेले.

आगाळी-फातोर्ध्यात बगल मार्ग पाण्याखाली

आलॅमच्या जंक्शनपासून आगाळी- फातोर्डा मार्गे रावणफोंडच्या जंक्शनपर्यंत जाणारा राष्ट्रीय महामार्गावरील पूर्व बगल रस्ता पूर्णपणे पावसाच्या पाण्याखाली गेला. अशोका पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावर पावसाचे पाणी तुडुंब भरल्याने पंप मालक तसेच वाहन चालकांना कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागते.

राष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याने बगल रस्त्यावर योग्य प्रकारे गटार बांधणी केलेली नाही. मडगावच्या पालिकेकडूनही गटारांची साफसफाई केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी अतिवृष्टीत या भागात रस्ता पाण्याखाली जाऊन वाहन चालकांना त्रास होतो. अशोका पेट्रोल पंपाजवळ गेल्या दीड-दोन दशकांपासून प्रत्येक पावसाळ्यात मार्ग पूर्णपणे पाण्याखाली जात असल्यामुळे लोकांना हा त्रास होतो. यासंदर्भात लोकांनी अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्याकडे तक्रारी केल्या होत्या.

 

टॅग्स :goaगोवाmonsoonमोसमी पाऊस