शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

तपास कामावरील अपुरा खर्च दलालांच्या पथ्यावर, मानवी तस्करी परिषदेतील सूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 22:01 IST

तपास कामावर करण्यात येणारा अपुरा खर्च  हा वेश्या दलालांच्या पथ्यावर पडत असल्याचा सूर पोलीस खात्याने आयोजित केलेल्या मानवी तस्करी या विषयीवरील परिषदेत वक्त्यांकडून व्यक्त करण्यात आला.

पणजी: तपास कामावर करण्यात येणारा अपुरा खर्च  हा वेश्या दलालांच्या पथ्यावर पडत असल्याचा सूर पोलीस खात्याने आयोजित केलेल्या मानवी तस्करी या विषयीवरील परिषदेत वक्त्यांकडून व्यक्त करण्यात आला. निवृत्त पोलीस निरीक्षक (आयपीएस) आणि टाटा इन्स्टीट्युट आॅफ सोसिएल सायन्सचे प्रोफेसर पी एम नायर सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील रवी कांत आणि अर्ज संस्थेचे संचालक अरूण पांडे या परिषदेत वक्ते होते. अ‍ॅड. कांत यावेळी बोलताना म्हणाले की, मानवी तस्करीची लॉबी अतिशय शक्तीमान असून संघटीतही आहे. अमाप पैसा खर्च करण्याची कुवत या लॉबीत आहे. त्यामुळे अशा लॉबिविरुद्ध लढा देताना आपल्या पोलिसांचा अपु-या साधन सुविधांनिशी निभाव लागणार नाही. इशान्येकडील राज्यांत असलेल्या संशयितांना शोधण्यासाठी आपल्या तपास अधिका-याला ट्रेनची तिकीट देऊन पाठविले जाते. तपास अधिकारी विमान प्रवासाचा अधिकार नाही. ही गोष्ट गुन्हेगारी जगताच्या सोयीची ठरत असल्याचे ते म्हणाले. या गुन्हेगारी लॉबीने त्यांच्या सोयीसाठी अनेक राज्यात बिगर सरकारी संस्थाही उभ्या केल्या असून पोलिसांनी सावध व्हावे असे त्यांनी सांगितले. अशी प्रकरणे हाताळताना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. पिडित मुली आणि त्यांची कुटुंबे फार मोठ्या तणावाखाली असतात. त्यामुळे तपास अधिका-यांनी सर्व प्रकारच्या खबरदा-या घेणे आवश्यक आहे, तसेच वरिष्ठांनी तपास अधिका-यांना सहकार्य करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पी एम नायर यांनीही तपास अधिका-याने मानवी तस्करी प्रकरणात छापे टाकण्यापूर्वी भरपूर तयारी करण्याची गरज व्यक्त केली. फॉरेन्सिक चाचण्या या बाबतीत खूप महत्त्वाच्या असतात. तसेच अशा धंत्यातून कमावलेले पैसेही जप्त करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.  अरूण पांड्ये यांनी मानवी तस्करीच्या बाबतीत गोव्यातील परिस्थितीची माहिती यावेळी दिली. पोलीस महानिरीक्षक  जसपाल सिंग यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत पोलीस अधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, सरकारी वकील आणि बिगर सरकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवा