शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

विदेशात पळून गेल्याचा संशय असलेल्या रॉडनीचा कसून शोध सुरु; विमान प्राधिकरणाकडे पोलिसांनी साधला संपर्क

By सूरज.नाईकपवार | Updated: March 23, 2024 17:07 IST

संशयिताबद्दल कुठलीही माहिती असल्यास ती द्यावी असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सूरज नाईकपवार,मडगाव : गोव्यातील मडगाव येथील  भू-सर्वेक्षण खात्यातील मुख्य सर्वेक्षकाला मारहाण प्रकरणातील संशयित रॉडनी सावियो ऑल्वन गोम्स हा विदेशात पळून गेल्याची दाट शक्यता असून, त्यासंबधी माहिती गोळा करण्यासाठी सदया पोलिसांनी विमान प्राधिकरणाकडे संपर्क साधला आहे. संशयिताबद्दल कुठलीही माहिती असल्यास ती द्यावी असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

फातोर्डा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्याशी संपर्क साधला असता, अजूनही संशयिताचा ठावठिकाणा सापडलेला नसून, आम्ही तपास करीत असल्याचे ते म्हणाले. सर्व बाबी पोलिस पडताळून बघत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सोमवार, दि. १८ रोजी दुपारी येथील माथानी साल्ढाणा संकुलात असलेल्या भू सर्वेक्षण खात्यातील मुख्य सर्वेक्षक प्रसाद सावंत देसाई यांना कार्यालयात आलेल्या एका अनोळखी इसमाने मारहाण केली होती. हेल्मेटने मारहाण करून नंतर संंशयिताने घटनास्थळाहून पळ काढला होता. या मारहाणीत देसाई हे जखमी झाले होते.

पोलिसांना त्या मारेकऱ्याची दुचाकी सापडली होती. ती वार्का येथील एका महिलेच्या नावावर नोंदणीकृत आहे. पोलिसांनी तिच्या घरी जाऊन चौकशी केली असता, ती दुचाकी विकली गेली होती. मात्र, त्याच्या नावावर ती ट्रान्सफर केली गेली नव्हती, अशी माहिती मिळाली होती. चौकशीत पोलिसांना संशयिताचे नाव सापडले होते. पोलिस त्याच्या शोधात असून तो विदेशात पळून गेल्याची माहिती समोर आली आहे.

संशयितावर पोलिसांनी लुकआउट नोटीसही जारी केली आहे. भादंसंच्या ३२३, ५०४, ३५३ व ५०६ (२) कलमांखाली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिस निरीक्षक नॅथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अतिकेश खेडेकर पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी