शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा रेंट अ कारसह बाईकचे परवाने रद्द करू!; मुख्यमंत्री सावंत यांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 07:21 IST

वाहतूक खाते करणार अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : रेंट ए कार, रेंट ए बाइकवाल्यांनी खासगी वाहनांचा व्यावसायिक वापर केल्यास तत्काळ परवाने रद्द केले जातील. त्यासाठी लवकरच वाहतूक खाते वटहुकूम काढणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

पोलिस मुख्यालयात काल घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पोलिस तसेच आरटीओ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. वाहतूक संचालक प्रविमल अभिषेक, आयजीपी, डीआयजी, उत्तर व दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर याप्रसंगी बैठकीला उपस्थित होते.

उत्तर गोव्यात पत्रादेवी व केरी चेक नाक्यांवर, तसेच दक्षिण गोव्यात मोले व पोळे चेक नाक्यांवरील पायाभूत सुविधांच्या प्रगतीचा आणि अंमलबजावणी तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. रस्त्याच्या कडेला सार्वजनिक सुविधा आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी जमिनीची उपलब्धता आणि आयटीजी द्वारे अर्ज प्रक्रियेचा आढावा घेतला आणि पोलिस अधिक्षकांकडून अंमलबजावणीविषयी माहिती घेतली. सार्वजनिक अधिसूचना धोरण, सीमेवरील स्वयंचलित देखरेख यंत्रणा याबाबत आढावा घेतला.

पर्यावरणीय उपक्रम म्हणून सर्व पोलिस ठाण्यांमध्ये 'एक पेड माँ के नाम' हा हरित उपक्रम राबविला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सरकार गोव्याच्या सीमेवर अखंड, पारदर्शक आणि नागरिक अनुकूल गतिशीलता आणि अंमलबजावणी परिसंस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. रेंट ए कार, रेंट ए बाईकवरुन अलीकडेच महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सार्वजनिक पार्किंगची जागा ही वाहने व्यापतात व त्यामुळे इतर वाहनधारकांवर अन्याय होतो. नवीन परवाने देणे बंदच करावेत, अशी मागणी बाबुश यांनी केली होती. 

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतRto officeआरटीओ ऑफीस