शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

गोव्यातील खाण अवलंबितांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकारकडून दुर्लक्षच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 16:13 IST

गोव्याच्या खाण अवलंबितांनी दिल्लीत तीन दिवस आंदोलन केले,

पणजी : गोव्याच्या खाण अवलंबितांनी दिल्लीत तीन दिवस आंदोलन केले, परंतु भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने किंवा मोदी सरकारने साधी दखलसुद्धा घेतली नाही. तीन दिवसात केंद्राचा एकही मंत्री अवलंबितांच्या भेटीसाठी आला नाही, त्यामुळे खाणींच्या बाबतीत केंद्राचे धोरण आता स्पष्ट झाले आहे. 

गुरुवारी जंतरमंतरवर अवलंबितांच्या आंदोलनाची काल सांगता झाली. खाणींवरील कामगार, खनिजवाहू ट्रकांवरे काम करणारे चालक, क्लीनर, बार्जेसवरील कामगार, मशिनरींवरील कामगार मिळून गोव्यातील सुमारे ६00 खाण अवलंबितांनी दिल्लीला ११ आणि १२ रोजी राम लीला मैदानावर तर १३ रोजी जंतरमंतरवर धरणे धरून आंदोलन केले.गोव्याचे बहुतांश सर्व पक्षांचे आमदार, मंत्री, पक्षाध्यक्ष यांनी अवलंबितांची दिल्लीत भेट घेऊन पाठिंबा दिला. माजी पंतप्रधान देवेगौडा यांनीही प्रत्यक्ष भेटून समर्थन दिले. परंतु भाजपच्या एकही केंद्रीय नेत्याने किंवा मोदी सरकारमधील मंत्र्याने भेट दिली नाही. गोव्यातून भाजपचे मंत्री नीलेश काब्राल तेवढे भेटले. वास्तविक खाण अवलंबितांनी दिल्लीपर्यंत हे आंदोलन पोहोचविल्याने भाजपाचे केंद्रीय नेते किंवा  केंद्रीय मंत्री भेट देतील किंवा मोदी सरकारचा एखादा दूत तरी येईल, अशी अवलंबितांची अपेक्षा होती. कारण याआधी आंदोलने झाली तेव्हा भाजपने असे दूत पाठवले होते. परंतु यावेळी भाजपसाठी गोव्याचे प्रभारी म्हणून काम पाहणारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेदेखील फिरकले नाहीत. त्यामुळे अवलंबितांचा अपेक्षाभंग झाला. आंदोलकांनी पंतप्रधान कार्यालयात निवेदन सादर केले असून गोव्यातील खाणी पूर्ववत सुरू करण्यासाठी हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

काँग्रेसचा आटापिटा 

दरम्यान दुसरीकडे या आंदोलनाचा राजकीय लाभ उठविण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. गुरुवारी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, ज्येष्ठ आमदार लुइझिन फालेरो, पक्षाचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी अवलंबितांची भेट घेऊन समर्थन दिले. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना जंतरमंतर आणून खाण भागातील लोकांची गोव्यात कॉंग्रेससाठी सहानुभूती मिळविण्याचेही प्रयत्न चालले होते. परंतु मध्य प्रदेश, राजस्थान मुख्यमंत्र्याच्या निवड प्रक्रियेत राहुलजी व्यस्त राहिल्याने आंदोलकांची भेट घेऊ शकले नाहीत. 

‘नाताळनंतर गोवा बंद’

आंदोलकांचे नेतृत्व करणारे पुती गांवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, केंद्र सरकारकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्याने आंदोलकांनी येत्या नाताळनंतर २६ ते ३१ डिसेंबर या काळात एक दिवसाचा गोवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, ‘नाताळला लोकांना त्रास होऊ नये यासाठी २५पर्यंत आम्ही वाट पाहू. २५ नंतर महिनाअखेरपर्यंत पुढील तीन चार दिवसात कधीही गोवा बंद करु शकतो. राहुल गांधी यांची भेट आज निश्चित होऊ शकते त्यानंतर शिष्टमंडळ त्यांची भेट घेईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी प्रयत्न चालू होते, परंतु ती न मिळाल्याने शेवटी निवेदन सादर करण्यात आले.’

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळा