शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पगुच्छ द्याल तर शिक्षा करू, पर्रीकरांनी सरकारी कर्मचाऱ्यांना बजावले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 15:48 IST

सरकारी कार्यालयांनी कुणालाच सोहळ्यावेळी पुष्पगुच्छ देऊ नये. फक्त एक फुल द्यावे. वारंवार सरकारने परिपत्रके जारी करून सरकारी कार्यालयांना बजावले आहे.

पणजी, दि. 8 - सरकारी कार्यालयांनी कुणालाच सोहळ्यावेळी पुष्पगुच्छ देऊ नये. फक्त एक फुल द्यावे. वारंवार सरकारने परिपत्रके जारी करून सरकारी कार्यालयांना बजावले आहे. मात्र त्या सूचनेचा पालन होत नाही. यापुढेही जर पुष्पगुच्छच सरकारी कार्यालयांनी दिले तर मात्र संबंधितांना शिक्षा करावी लागेल, असा इशारा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सोमवारी येथे दिला.पणजीतील कला अकादमीत तीन दिवसीय पर्यावरणविषयक सिनेमा महोत्सवाचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. हा कार्यक्रम शासकीय नव्हता पण मुख्यमंत्र्यांना आयोजकानी मोठा पुष्पगुच्छ दिला व स्वागत केले.मुख्यमंत्री म्हणाले की निदान पर्यावरणाचा आग्रह धरणाऱ्यांनी फुले वाया घालवू नयेत किंवा कचर्‍याची निर्मिती करू नये. फक्त शब्दांनीच स्वागत करता आले असते. पुष्पगुच्छाला अनेकदा छोटे प्लास्टिकही लावले जाते. सरकारी कार्यालयेही वारंवार पुष्पगुच्छांचाच वापर करतात. हे पर्यावरणास पुरक नाही.पर्रीकर म्हणाले की यापुढे जर सरकारी कार्यालयांनी पुष्पगुच्छ दिले तर शिक्षाच दिली जाईल. प्लास्टिकच्या बॅगांना तर आम्ही सर्वांनी मुठमातीच द्यायला हवी. गोवा सरकार यापुढे सरकारी कार्यक्रमांना प्लास्टिकचा वापर करणार नाही. सरकारी राजपत्रही यापुढे इलेक्ट्रोनिक रूपात दिले जाईल. कागदी रुपात राजपत्र उपलब्ध करून देणे हळूहळू बंदच केले जाईल.