शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
2
बांके बिहारी मंदिराच्या १०० वर्षांहून जुन्या 'तळघरात' अखेर काय सापडलं? साडे चार फूट सोन्याची काठी...
3
NSE Holidays 2025: उद्या शेअर बाजारात कामकाज सुरू राहणार का? स्टॉक मार्केटला कधी-कधी आहेत सुट्ट्या, पाहा यादी
4
Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
5
'आमचा विश्वास कायद्यावर आहे, पण...' : जुबिन गर्ग यांच्या मृत्यूला एक महिना पूर्ण, तरीही गूढ कायम!
6
Laxmi Pujan 2025 Puja Vidhi: लक्ष्मीपूजन कसे करावे? पहा साहित्याची यादी, शुभ मुहूर्त आणि विधी
7
Bank FD मध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा २ लाखांपेक्षा अधिक व्याज; ही बँक देतेय जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
8
न भूतो न भविष्यति! दीपिका पादुकोण-ॲटलीच्या आगामी सिनेमावर रणवीर सिंहची प्रतिक्रिया
9
Cough Syrup : "पप्पा, हॉस्पिटलवाले सोडत नाहीत, पोलिसांना बोलवा...", कफ सिरपमुळे मृत्यू, शेवटची इच्छा अपूर्ण
10
मालक असावा तर असा... या व्यक्तीनं दिवाळीला कर्मचाऱ्यांना वाटल्या ५१ लक्झरी कार्स
11
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
12
दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार सुस्साट; सेन्सेक्स ३१७ तर निफ्टीमध्ये ११५ अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
VIRAL : भीती नाही, थरार! एका व्यक्तीने १००हून अधिक विषारी सापांचा वाचवला जीव; Video पाहून नेटकरी हैराण
14
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
15
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
16
'दीया और बाती' फेम अभिनेत्रीने ११ वर्षांचा संसार मोडल्यानंतर घेतला संन्यास, पदरात आहे एक मुलगा
17
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
18
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
19
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
20
Delhi AQI: दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...

निती आयोगाच्या सल्ल्याप्रमाणे वागेन : विश्वजित राणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 17:26 IST

गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात आम्हाला नवी बुद्धिमत्ता व नवे तंत्रज्ञान आणायचे आहे. त्यासाठी काही सेवांमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) आम्हाला स्वीकारावी लागेल.

पणजी - गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात आम्हाला नवी बुद्धिमत्ता व नवे तंत्रज्ञान आणायचे आहे. त्यासाठी काही सेवांमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) आम्हाला स्वीकारावी लागेल. याबाबत केंद्र सरकारच्या निती आयोगाने काही मार्गदर्शक तत्त्वे मंजुर केली आहे. आयोगाच्या तत्त्वांनुसार व आयोगाच्या सल्ल्यानुसार मी पाऊले उचलीन, असे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.लोकमतला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, की सार्वजनिक खासगी भागीदारीचे मॉडेल हे मी तयार केलेले नाही. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रलयाने ते तयार केले. यासाठी मंत्रलयाने अगोदर मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. ती तत्त्वे निती आयोगाने मान्य केली आहेत. सार्वजनिक खासगी भागिदारीने आरोग्य सेवांचा दर्जा कसा वाढायला हवा हे खूप अभ्यासाअंती ठरलेले आहे. आम्ही हे सगळे समजून घेऊन त्यानुसार गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात त्या मॉडेलचा स्वीकारला करायला हवा.मंत्री राणे म्हणाले, की काही सेवांमध्ये सार्वजनिक खासगी भागिदारी घेतली म्हणजे रुग्णालयांमधील सगळे काही काढून खासगी कंपनीला दिले असा अर्थ होत नाही. तो दृष्टीकोनच चुकीचा आहे. तसा विचार कुणी करू नये. बांबोळी येथे मोठा सुपरस्पेशालिटी विभाग उभा होत आहे. तिथे अनेक तज्ज्ञ काम करतील. तेथील काही विभागांमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारी घेता येईल. त्याविषयीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आपण ठेवल्यानंतर त्याविषयी चर्चा होईल. मॉडेल योग्य वाटले तर चर्चेअंती ते स्वीकारले जाईल. शेवटी निती आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या चौकटीत राहूनच मॉडेलचा विचार केला जाईल.मंत्री राणे म्हणाले, की दक्षिण गोव्यातील मडगाव येथील नव्या जिल्हा इस्पितळात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणण्याचा प्रस्ताव आहे. त्या रुग्णालयाच्या इमारतीमधील दोन मजले खासगी वैद्यकीय इस्पितळासाठी देता येतील. त्यामुळे जागांची संख्या वाढेल व गोमंतकीय विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार