शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मणीपूर प्रकरणावरून विधानसभेत हंगामा, सभापतीसह आमदारालाही घेरले

By वासुदेव.पागी | Updated: July 31, 2023 13:41 IST

विजय सरदेसाई यांनी त्यांचा माईक काढून घेतला.

पणजी: मणिपूर हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर विरोधकांकडून दाखल करण्यात आलेला खासगी ठराव सभापतींनी नाकारल्यामुळे विरोधकांनीविधानसभेत हंगामा केला. यावेळी शुन्य तासात बोलणाऱ्या जीत आरोलकर. यांना अडथळे आणून त्यांच्याशी गैरवर्तन केल्यामुळे युरी आलेमाव, विरेश बोरकर, वेन्जी विएगश, क्रूज सिल्वा, विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा आणि एल्टन डिकॉस्टा यांना सोमवार आणि मंगळवार या दोनदिवसांसाठी सभागृहातून  निलंबित करण्यात आले.

मणिपूरच्या घटनेच्या निषेध करणारा खाजगी ठराव दाखल करून न घेतल्यामुळे गदारोळ करून शुन्न्य तासाचे कामकाज रोखून धरण्याच्याप्रयत्नात  विरोधकांचा संयम सुटल्याचे यावेळी दिसून आले. सभापतींच्या पटलासमोर जाऊन घोषणा देणाऱ्या विरोधी सदस्यांना न जुमानतासभापतींनी कामकाज चालू ठेवल्यामुळे तहकुबीची अपेक्षा धरणारे निदर्शक नाराज झाले. त्यामुळे त्यांनी शुन्य तासाच्या कामकाजात बोलणारेमगोचे आमदार जीत आरोलकर यांच्याकडे धावले आणि त्यांना बोलताना अडथळा आणला. विजय सरदेसाई यांनी त्यांचा माईक काढून घेतला.

कामकाज रोखून धरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याही परिस्थितीत कामकाज चालू राहिल्यामुळे शुन्यतासाची सूचना करणारे आमदार जीतआरोलकर यांच्याकडे विरोधक धावले आणि त्यांना बोलण्यास प्रतिबंध करताना त्यांच्याकडून माईक काढून घेतला आणि त्यांचा अवमान केला.

मार्शलची टोपी आमदारांना घातली

सभापतींच्या पटलाजवळ जाऊन निदर्शने करणे काही नवीन गोष्ट नाही, परंतु  एखाद्या आमदाराला सभागृहात बोलताना घेरून अडथळाआणण्याची आणि त्याचा माईक काढून घेण्याची घटना पहिल्यांदाच घडली. त्याही पुढे जाऊन आमदार जीत आरोलकर  यांच्याकडील टीपणअसलेले पेपर काढून फेकून दिले आणि  सभागृहातील मार्शलची टोपी काढून  आमदार आरोलकर यांना घालण्याचा असभ्यपणाही केला. 

दुर्दैवी घटना:  सभापती

विरोधकांच्या या वर्तनाचा सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी तीव्र निषेध केला आणि आक्षेप घेताना त्यांच्यावर कारवाईची मागणीही केली. असाप्रकार आजपर्यंत या सभागृहात कधीच घडला नव्हता असे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी सांगिले. विरोधकांनी केवळ आमदाराचा नव्हे तरसभापतींचा आणि सभागृहाचाही अवमान केल्याचे सांगितले आणि त्यांच्या निलंबनाची मागणी केली सभापती रमेश तवडकर यांनी यावरप्रतिक्रिया नोंदविताना हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असल्याचे सांगितले. तसेच विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांच्यासह ७ जणांना सोमवार आणिमंगळवार असे दोन दिवस सभागृहातून निलंबित करण्यात आल्याचे सांगितले.

टॅग्स :goaगोवा