शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पावणे तीन लाखांची दारु, दोन कोटींची रोख जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 17:44 IST

अवैध मार्गाने येणारा साडेपाच कोटींचा ऐवज जप्त

- सुशांत कुंकळयेकर

मडगाव: निवडणूक काळात अवैध मार्गाने येणारी दारु, अंमलीपदार्थ आणि रोखीच्या व्यवहारावर कडक निर्बंध आणण्यात आले असून आतापर्यंत या तिन्ही प्रकारातून दोन कोटींच्या रोख रकमेसह एकूण साडेपाच कोटी रुपयांचा माल पकडण्यात आला आहे. 10 मार्चपासून गोव्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. त्या दिवसापासून 17 एप्रिलपर्यंत ही कारवाई करण्यात आली आहे.आतापर्यंत जी आकडेवारी हाती लागली आहे. त्यानुसार यात बेकायदेशीर दारुच्या प्रकरणांचा अधिक समावेश असून आतापर्यंत 2.72 कोटी रुपयांची बेकायदेशीर दारु पकडण्यात आली असून त्यापैकी 2.43 कोटींची दारु उत्तर गोवा मतदारसंघात पकडण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या अंमली पदार्थाची एकूण रक्कम 46.80 लाख एवढी असून जप्त केलेली रोख रक्कम 2.09 कोटी इतकी आहे. त्याशिवाय बेकायदेशीर वाळू व्यवसाय आणि मटका व्यावसायिकांवर धाडी घालून सुमारे साडेतीन लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अशा अवैध रितीने झालेल्या व्यवहारातून आलेला पैसा निवडणुकीत मतदारांना आमिषे दाखविण्यासाठी वापरला जाण्याची शक्यता असते. त्यामुळेच निवडणूक काळात या अशा व्यवहारावर कडक नजर ठेवली जाते. एकट्या दक्षिण गोव्यातच 10 मार्च ते 17 एप्रिल या कालावधीत बेकायदेशीररित्या दारु विक्रीची 78 प्रकरणांची नोंद करण्यात आली असून त्यातून 29.85 लाख रुपयांचा माल पकडला आहे. तर अंमली पदार्थ विकणाऱ्यांच्या विरोधात 18 प्रकरणांची नोंद झाली असून त्यांच्याकडून 6.81 लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे.आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यात अवैधरित्या आलेली 2.09 कोटींची बेहिशोबी रोख जप्त केली आहे. त्यात दाबोळी विमानतळावर एका प्रवाशांकडून 25 लाख रुपयांची जप्त केलेल्या रकमेचाही समावेश आहे. याशिवाय आयकर विभागाने हल्लीच मडगावच्या एका मटका बुकीवर घातलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणावर रोख जप्त केली होती.गोव्यातील व्यावसायिक कर आणि जीएसटी आयुक्त दीपक बांदेकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बँकेतून एकाचवेळी 10 लाखापेक्षा अधिक रक्कम काढणाऱ्या ग्राहकांची यादी बँकेने आयकर खात्याला द्यावी अशी सूचना करण्यात आली आहे. निवडणुकीच्या काळात पैशांचा व्यवहार होऊ नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.बेकायदेशीर दारु विक्रीच्या विरोधातही पोलीस व अबकारी खात्याने कडक कारवाई केली असून गोव्याच्या दोन्ही सीमांवरुन आत येणारी वाहने तपासण्यासाठी खास पथकांची सोय केली आहे. यापूर्वी उत्तर गोव्यात बांदा आणि पत्रदेवी चेक नाक्यावर 3.40 लाखांची दारु पकडण्यात आली होती. तर काणकोणच्या पोळे चेक नाक्यावर जवळपास आठ लाखांची दारु पकडण्यात आली होती. याशिवाय म्हापशात केलेल्या एका कारवाईत 15 लाखांची दारु घेऊन जाणारी एक गाडी जप्त केली होती. तर धारगळ येथे तीन गोदामात बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेली तब्बल दीड कोटींची दारु पकडण्यात आली होती.

 

टॅग्स :goaगोवा