शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

इफ्फीत उद्घाटनाच्या सिनेमाला प्रचंड गर्दी; अनेकांचा अपेक्षाभंग, पोलिसांवर ताण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2017 21:09 IST

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बियाँड द क्लाउड्स या उद्घाटनाच्या चित्रपटाला प्रतिनिधींची संख्या प्रमाणापेक्षा वाढल्याने अनेकांची निराशा झाली.

ठळक मुद्देइफ्फीत उद्घाटनाच्या सिनेमाला प्रचंड गर्दी प्रतिनिधींची संख्या प्रमाणापेक्षा वाढल्याने अनेकांची निराशाअधिका-यांना प्रवेशद्वारासमोर पोलिसांचे कडे

पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बियाँड द क्लाउड्स या उद्घाटनाच्या चित्रपटाला प्रतिनिधींची संख्या प्रमाणापेक्षा वाढल्याने अनेकांची निराशा झाली. दरवर्षी गर्दी झाल्याने होणारा गोंधळ टाळण्यासाठी स्वत: उत्तर गोवा पोलीस अधीक्षक चंदन चौधरी या फौजफाटा घेऊन उपस्थित होत्या. त्यामुळे प्रतिनिधींनी गोंधळ घातला नाही, पण आपली नाराजी मात्र व्यक्त केली.आयनॉक्सच्या स्क्रिन 1 या थिएटरची आसनक्षमता जवळपास सहाशे आहे. त्यापेक्षा अधिक प्रतिनिधींना सोडता येत नव्हते. एकाच थिएटरमध्ये हा उद्घाटनचा शो असल्याने सायंकाळी चारपासूनच अनेकजण आवारातच होते. रांग लावण्यास सुरुवात झाल्यानंतर गर्दी वाढू लागली. एकाच प्रवेशद्वारातून प्रेक्षक सोडले जात असल्याने पूर्ण आयनॉक्सच्या पुढील आवारात प्रतिनिधींची मोठी यू आकाराची रांग लागलेली होती.आसनक्षमतेएवढे प्रतिनिधी सोडल्यानंतर स्वत: चौधरी यांनी आयनॉक्समध्ये जाऊन पाहणी केली. त्यानंतर अधिका-यांना प्रवेशद्वारासमोर पोलिसांचे कडे करण्यास सांगितले. थिएटरमध्ये प्रतिनिधी सोडले जात होते, तोर्पयत रांगेत उभे राहणा-यांचीही संख्या कायम होती. जेव्हा प्रतिनिधी सोडण्यास बंद झाले तेव्हा स्वत: मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी बाहेर येऊन क्षमता पूर्ण झाल्याचे सांगितले. त्याचवेळी काही प्रतिनिधी त्यांना गराडा घालतात असे दिसताच पोलिसांनी सर्वांना बाजूला केले.दरम्यान, ज्यांची चित्रपट पाहण्याची संधी हुकली त्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक जण आयोजन समितीच्या प्रतिनिधींना इतर थिएटरमध्ये चित्रपट का लावला नाही, अशी विचारणा करीत होते. आयनॉक्सच्या एकावेळी चार थिएटरपैकी किमान दोन-तीन थिएटरमध्ये दाखविता आला असता तर रसिकांची निराशा झाली नसती, असेही काहींचे म्हणणे होते.सध्या आयनॉक्स आणि मॅकेनिझ पॅलेससह मांडवी किना-याच्या बाजूने केलेल्या विद्युत रोषणामुळे या परिसराला वेगळीच छटा प्राप्त झाली आहे. त्यामुळे या परिसरात सकाळपासून अनेकजण मोबाईलवरून छायाचित्रण आणि सेल्फी काढताना दिसतात. त्यात इफ्फीसाठी आलेल्या प्रतिनिधींचाही समावेश असतोच.

अद्याप कामे सुरूचइफ्फीनिमित्त मांडवी किना-याच्या झाडांच्या भोवती सुशोभिकरणाचे काम अद्याप सुरूच आहे. काही ठिकाणी लोखंडी ग्रील बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे, तर काही ठिकाणी अद्याप बांधकामाला प्लास्टर करण्याचेच काम सुरू आहे. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे येथील कर्मचा-याने सांगितले.

टॅग्स :IFFI Goa 2017इफ्फी गोवा 2017