शहरं
Join us  
Trending Stories
1
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
2
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
3
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
4
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
5
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
6
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
8
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
9
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
10
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
11
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
12
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
13
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
14
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
15
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
16
Mumbai: मुंबई महापालिकेच्या ३०० कोटींच्या उद्यान देखभालीच्या निविदा प्रक्रियेत संशयाच्या भोवरा
17
बिहार निवडणूक; 'या' मतदारसंघात भाजप उमेदवाराचा अवघ्या 30 मतांनी पराभव
18
IPL 2026 : रवींद्र जडेजाच्या पगारात ४ कोटींची कपात होण्यामागचं कारण काय? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
19
Tata Sierra आता नव्या रुपता! मिळणार ट्रिपल स्क्रीन सेटअप अन् अ‍ॅडव्हॉन्स फीचर्स, किती असेल किंमत? जाणून घ्या सविस्तर
20
BMC Election: सर्वपक्षीय १२८ माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेला पालिकेत हव्या १२५ जागा!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधक एकत्र कसे येतील? २०२७ मध्ये गोवा विधानसभा निवडणूक अन् राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 12:54 IST

आता डिसेंबरनंतर गोव्याचे निवडणूक वर्षच सुरू होईल असे म्हणावे लागेल.

सारीपाट, सदगुरू पाटील, संपादक, गोवा

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागला, त्यातून गोव्यातील राजकीय पक्षांनाही धडा मिळालेला आहे. विशेषतः विरोधी पक्षांकडे जर सारासार विचार करण्याची क्षमता राहिली असेल तर ते धडा घेतील. मात्र गोव्यात विरोधक एकत्र येण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. गोवा विधानसभा निवडणूक येत्या दीड वर्षाच्या आत होणार आहे. पुढील अकरा महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. येत्या जानेवारी २०२६ पासूनच आपले निवडणूक वर्ष सुरू होणार आहे. जरी निवडणुका तांत्रिकदृष्ट्या २०२७च्या प्रारंभी होणार असल्या, तरी आता डिसेंबरनंतर गोव्याचे निवडणूक वर्षच सुरू होईल असे म्हणावे लागेल.

अशावेळी विरोधी पक्षांचे एकमेकांशी पटत नाही हे गोव्यातील मतदार रोज ठळकपणे अनुभवत आहेत. आम आदमी पक्षाला काँग्रेससोबत युती नको. आपने उघडपणे काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. अरविंद केजरीवाल तर गोव्यात येऊन सांगूनच गेले आहेत की काँग्रेससोबत अजिबात युती होणार नाही. तो पक्ष भाजपला मदत करतोय असा केजरीवाल यांचा आरोप आहे. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे व इतरांनी केजरीवाल यांना परवा त्याच भाषेत उत्तर दिले आहे. जो पक्ष (म्हणजे आप) भाजपसोबत आहे, त्या पक्षासोबत आमची युती होऊ शकत नाही, असे काँग्रेसचे नेते पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलले.

एकंदरीत गोव्यात सगळे विरोधी पक्ष एकमेकांच्या उरावर बसले आहेत असे दिसून येते. आरजी, आप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड हे पक्ष एकमेकांविरुद्धच लढत आहेत. ते भाजपशी कसे लढू शकतील हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सामान्य माणसाच्या मनात हा प्रश्न आहे. बिहारमध्ये विरोधकांचा सुफडासाफ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा करिष्मा अजून आहेच.

शिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेले चांगले काम देखील तेथील मतदार मान्य करतात. त्यामुळेच नितीश यांच्या पक्षालाही यश मिळाले. भाजपच्या अनेक केंद्रीय नेत्यांनी बिहारमध्ये खूप कष्ट घेतले होते. सर्वाधिक जाहीर सभा मोदी, अमित शहा यांच्या झाल्या होत्या. शिवाय भाजपने संघटनात्मक काम प्रभावी केले होतेच. निवडणूक अतिशय गंभीरपणे घेणारा भाजप हा पक्ष आहे. त्या पक्षाची विचारधारा काहीजणांना पटली नाही तरी, त्या पक्षाचे केंद्रीय नेते व कार्यकर्ते खूप कष्ट घेतात, हे मान्य करावे लागेल. या उलट स्थिती काँग्रेसमध्ये असते. तेजस्वी यादव यांनीही खूप कष्ट घेतले होतेच. यादव यांच्या पक्षाला मते जास्त मिळाली, पण विधानसभा मतदारसंघ जास्त संख्येने जिंकण्याची किमया भाजपने व नितीश कुमार यांच्या पक्षाने केली. 

भाजपचे निवडणूक व्यवस्थापन प्रभावी असते. भाजपमध्येही गटबाजी असते, नेत्यांमध्ये मतभेद खूप असतात, कार्यकर्त्यांमध्येही कुरबुरी खूप असतात, पण ते सगळे नेते व कार्यकर्ते निवडणुकीवेळी विरोधकांविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येतात. व्यक्तिगत मतभेद कुरवाळत न बसता सगळे केंद्रातील नेते एकत्र शक्ती वापरतात. यामुळेच काँग्रेस पक्ष व एकूणच विरोधी पक्षांचे कंबरडे मोडले जाते. केवळ मतांची कथित चोरी करून निवडणुका जिंकता येत नाहीत. इलेक्ट्रॉनिक मशीन्स मॅनेज केली किंवा मतांची चोरी केली वगैरे आरोप आता थोतांड वाटू लागलेत. निवडणुका जिंकायच्या असतील तर काँग्रेसला व एकूणच विरोधकांना वेगळी रणनिती आखावी लागेल. फालतू आरोप करत राहिले तर भाजपला फरक पडणार नाही. मतदार भाजपसोबतच राहतील, हे बिहारमध्ये अधिक ठळकपणे स्पष्ट झाले आहे.

गेल्या वर्ष किंवा दोन वर्षाचा आढावा घेतला तर गोव्यात विरोधकांमध्ये विजय सरदेसाई प्रभावी नेते ठरले आहेत. युरी आलेमाव हे विरोधी पक्षनेतेपदी असले तरी, सरकारला चिमटा काढत लोकांचे विषय मांडण्याचे जास्त कौशल्य विजयकडे आहे. शिवाय रणनिती ठरविण्याचीही क्षमता आहे. काँग्रेसचे आमदार एल्टन असोत किंवा कार्ल्स फरैरा असोत, ते विजयला साथ देतात. विजय यांचा गोवा फॉरवर्ड पक्ष हा शक्तीने मर्यादित असला तरी, विरोधकांना धाडस देण्याचे काम विजय करत आहेत. सरदेसाई यांचे आता गिरीश चोडणकर यांच्याशी चांगले पटते. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद गिरीशकडे नाही. ते अमित पाटकर यांच्याकडे आहे. पाटकर यांच्याशी सरदेसाई यांचे मुळीच पटत नाही. अमित पाटकर व विजय सरदेसाई यांची मैत्री होऊ शकत नाही. यातून काँग्रेसचे व फॉरवर्डचेही नुकसान होईल. एकूणच विरोधकांमध्ये अंतर्गत मतभेद जास्त आहेत. मांद्रेचे सरपंच अमित सावंत यांना परवा चपळाईने काहीजणांनी काँग्रेस पक्षात घेतले. 

विजय सरदेसाई यांना धक्का देण्याची ती रणनिती होती. अमित सावंत यांना विजयने फॉरवर्ड पक्षात घेतले होते, पण काँग्रेसने पुन्हा सावंत यांना गळाला लावले. यामुळे नाराज झालेल्या विजयने शुक्रवारी रात्री मीडियाला जी प्रतिक्रिया दिली ती, पाटकर यांच्या दिशेने बाण सोडणारी ठरली. सरदेसाई हे काँग्रेसच्या खेळीमुळे जखमी झाले आहेत, त्यांनी थेट माणिकराव ठाकरे यांच्याशी संपर्क साधलेला आहे. युरी आलेमाव यांच्याशीही विजयची मैत्री नाही, पण कदाचित युरी विजयसोबत जुळवून घेऊ शकतील. राजकारणात तडजोडी कराव्याच लागतात.

आरजी पक्ष स्वतःची वेगळी वाट चालत आहे. तूर्त मनोज परब यांनी विजय सरदेसाई यांच्याशी केवळ राजकीय दोस्ती केलेली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी आरजी व सरदेसाई एकत्र आले तर काँग्रेसची हानी होईल. शिवाय आम आदमी पक्षानेही स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले, तर काँग्रेसचे जास्त नुकसान होऊ शकते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप जिंकला, कारण विरोधकांमध्ये एकी नव्हती. विरोधकांनी अजूनही त्यापासून धडा घेतलेला नाही. वीरेश बोरकर हे २०२२ साली सांतआंद्रे मतदारसंघात ७० मतांनीच जिंकले होते. आता २०२७ साली जिंकण्यासाठी वीरेशला काँग्रेसची मदत लागेल, हे सांगण्यासाठी जास्त खोलात शिरण्याचीही गरज नाही. बिहारमधील यशामुळे भाजपचा आत्मविश्वास खूप वाढला आहे. भाजपमध्ये शक्ती वाढलेली आहे. गोव्यातील विरोधकांना आपल्या रणनितीचा फेरविचार करावा लागेल, अन्यथा काही खरे नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Goa: Opposition disunity jeopardizes 2027 election chances against BJP.

Web Summary : Goa's opposition parties are fractured, hindering their ability to challenge the BJP in the upcoming 2027 election. Infighting and lack of unity, unlike Bihar's example, threaten their success. A strategic rethink is crucial.
टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण