शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

रस्त्यांना किती बळी द्यायचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:38 IST

गोव्यातील रस्त्यांवर जाणारे बळी पाहून गोवा सरकारमधील अनेकांना आता कदाचित वाईटदेखील वाटत नसेल.

गोव्यातील रस्त्यांवर जाणारे बळी पाहून गोवा सरकारमधील अनेकांना आता कदाचित वाईटदेखील वाटत नसेल. दर दोन दिवसांनी एकाचा जीव जातो किंवा हात-पाय तरी मोडतात. सर्व बाजूंनी पूल व उड्डाणपूल बांधले गेले. म्हापसा ते पणजीपर्यंत, पेडण्याहून पणजीत येताना, पणजीहून मडगाव व वास्को किंवा फोंड्याला जाताना अनेक पूल लागतात. मात्र, अनेक ठिकाणी मूळ रस्त्यांवर असलेली वळणे, खड्डे, धोकादायक जागा अपघातांस कारण ठरत आहेत. काही ठिकाणी सूचना फलक नाहीत. दुपारी विद्यालये सुटतात तेव्हा जिथे वाहतूक पोलिस उभे राहायला हवेत, तिथे ते नसतात. 

दारू पिऊन वाहने चालविणारे चालक तर खुनीच ठरू लागले आहेत. त्यांच्याविरोधात मोठी मोहीम सुरू होण्याची गरज आहे. वाहतूक खाते, सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक पोलिस विभाग यांच्यात समन्वयच नाही. त्यामुळे अपघातांविरुद्ध एकत्रित प्रभावी उपाययोजना होत नाही. लोकांना तालांव देऊन सरकारी तिजोरी भरली की, काम झाले असे सरकारी यंत्रणांना वाटते.

रोज तरुणांचे जीव वाहन अपघातात जातात आणि सत्ताधारी काही करत नाहीत, फक्त कोट्यवधी रुपये खर्चुन नवनवे इव्हेंट्स तेवढे केले जातात. सामान्य माणूस हतबल झालेला आहे. वाहतूक खात्याने केलेल्या सूचनांची सार्वजनिक बांधकाम खात्यातील एका विभागाने अंमलबजावणीच केली नाही, अशी खंत मध्यंतरी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केली होती. एक वरिष्ठ अभियंते बैठकांनाच येत नाहीत, असेदेखील जाहीरपणे माविन बोलले होते. 

गिरी-पर्वरी येथे मंगळवारी सकाळीच अपघात झाला. दुचाकीस्वाराला बसगाडीने उडविले. त्यात सरकारच्या कायदा विभागाचे अवर सचिव नारायण अभ्यंकर यांचा जीव गेला. ते दुचाकी चालवत होते. एका निष्पाप अधिकाऱ्याचा वाहन अपघातात जीव गेला. त्यांच्या कुटुंबावर काय स्थिती ओढवली असेल याची कल्पना येते. 

सरकारी यंत्रणेने आता तरी जागे होऊन अपघातविरोधी मोहीम राबविण्याची गरज आहे. राज्यभर मोहीम राबवायला हवी आहे. केवळ रस्ता सुरक्षा सप्ताह साजरे करून काही होणार नाही. बसगाड्या, ट्रक, 'रेन्ट अ कार'सारख्या गाड्या लोकांचे दिवसाढवळ्या जीव घेत आहेत. बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात रोज अनेकजण अपघातात जखमी होऊन उपचारांसाठी येत आहेत. यात बहुतांश तरुणच असतात. रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या पादचाऱ्यांनादेखील वाहनांकडून उडविले जाते. हे किती काळ सहन करीत राहायचे? राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी भरून राहते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्या महिन्यात १३ रोजी एक विधान केले होते, जे पर्यटक भाड्याची वाहने घेऊन गोव्यात वाहन चालवतात, त्यांच्याकडून ७० टक्के वाहन अपघात केले जातात. म्हणजे गोव्यातील ७० टक्के अपघातांना पर्यटक जबाबदार आहेत. पर्यटकांना कारगाड्या भाड्याने देणे बंद करायला हवे. मात्र, काल एका अधिकाऱ्याचा जीव घेणारा बसचालक काही पर्यटक नव्हता. अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी ट्रक व टँकर्स लोकांना उडवतात. त्याचे चालक पर्यटक नसतात. 

अल्कोमीटरने चालकांची तपासणी करण्याची मोहीम मध्यंतरी सरकारी यंत्रणेने राबवली होती. ती मोहीम मग हळूच बंद होत असते. पणजीतील कॅसिनोंसह राज्यातील अनेक मोठ्या रेस्टॉरंटच्या परिसरात जर पोलिस उभे राहिले व वाहनचालकांची तपासणी केली तर अनेक दारूडे चालक सापडतील. गेल्या मे महिन्यात सरकारने रोड सेफ्टी धोरण जाहीर केले. वाहन अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी करू, असे जाहीर केले होते. रस्त्यावर दुचाकी घेऊन सकाळी बाहेर आलेला माणूस रात्री घरी सुरक्षित पोहोचेल याची हमी नसते. 

२०२३-२४ मध्ये गोव्यात एकूण २ हजार ६८२ अपघात झाले. त्यात २८६ लोक मरण पावले. हे प्रमाण कमी झालेले नाही. जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत सहा महिन्यांत अनेक तरुणांनी वाहन अपघातात प्राण सोडले आहेत. सरकार मोठ्या संख्येने मद्यालयांना परवाने देत सुटले आहे. गोव्यात सर्व साधनसुविधा आहेत आणि गोवा हे अत्यंत सुशिक्षित राज्य आहे, असे सांगणारे सरकार वाहन अपघातांविरोधात मात्र काही करू शकत नाही, हे लज्जास्पद आहे. 

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात