शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

काळ्या धनाची हेरफेर, विल्हेवाट कशी लागते?; कोट्यवधींचा हिशेब अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2022 08:28 IST

धन, धना धन, धन... एका रात्रीत एंट्री फीच्या नावाखाली कॅसिनो संचालकांकडे ९० लाख रुपये गोळा होतात. या ६०० पैकी २०० जण जुगार खेळत असावेत,

नरेश डोंगरे / आशिष रॉयपणजी (गोवा) : कॅसिनोवर रोज कोट्यवधींची उलाढाल होते. यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात काळ्या धनाची हेरफेरही होत असल्याची शंका आहे. त्याचा हिशेब कुणाला दिला जातो किंवा कोणाला सांगितला जातो, ते कळायला मार्ग नाही. हा हिशेब तपासला तर तपास यंत्रणांच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत, असे गोवा-पणजीकर म्हणतात.

कॅसिनो माफियांच्या उलाढालीकडे अनेकजण सूक्ष्म नजर ठेवून आहेत. सहज शहानिशा केल्यास ‘बात मे दम है’, असेही लक्षात येते. त्यानुसार, एका कॅसिनोवर रोज किमान पाचशे ते सातशे लोक जातात. एका व्यक्तीच्या प्रवेशासाठी कॅसिनो संचालकाच्या मर्जीप्रमाणे दोन हजारांपासून साडेतीन हजारांपर्यंतची रक्कम उकळली जाते. (यात खाणे, पिणे आणि नाचगाणे सर्वच उपलब्ध असल्याचे ग्राहकाला सांगितले जाते.) एन्ट्री फीच्या नावाखाली त्या कॅसिनो चालकाच्या गल्ल्यात सरासरी पंधरा लाख रुपये जमा होतात. सहा कॅसिनो संचालकांची गोळा बेरीज केली तर दरदिवसाची ही रोकड ९० लाख रुपयांवर पोहोचत, असा अंदाज आहे.

सातारा लुटले, पुण्यात सोडलेसातारा लुटले आणि पुण्यात सोडले, अशी एक जुनी म्हण आहे. ती गोव्याच्या कॅसिनोतून गोळा केलेल्या रकमेच्या बाबतीत खरी ठरावी. गोव्यातील प्रचंड उलाढाल कुठे जाते, त्याबाबत उलटसुलट चर्चा आहे. ही एवढी प्रचंड रक्कम गोव्यातून दिल्ली, मुंबई, गुजरात आणि हरयाणात पोहोचते, अशीही चर्चा आहे. या संबंधाने वेगवेगळ्या प्रांतांतील काही वजनदार नावेही घेतली जातात. महिन्याला या शंभर कोटींचा हिशेब कोण ठेवतो, सरकारला किंवा अन्य सरकारी यंत्रणांना तो टॅक्सच्या रूपात किती दिला जातो, हा स्वतंत्र तपासाचा विषय ठरावा.

महिनाभरात शंभर कोटींहून अधिक रकमेची उलाढाल एका रात्रीत एंट्री फीच्या नावाखाली कॅसिनो संचालकांकडे ९० लाख रुपये गोळा होतात. या ६०० पैकी २०० जण जुगार खेळत असावेत, असे गृहीत धरल्यास आणि प्रत्येकाची जुगाराची रोकड फक्त वीस हजार रुपये धरली तर चाळीस लाख रुपये जुगाराची उलाढाल होते. एन्ट्री फी आणि जुगाराची उलाढाल प्रत्येक रात्री साडेतीन कोटी रुपयांच्या घरात पोहोचते. महिनाभरात कॅसिनो लॉबी शंभर कोटी रुपयांपेक्षाही जास्त उलाढाल करते.