शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

...तर 'मोपा'साठी जमीन कशी मिळाली?; अमित पाटकरांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2024 12:40 IST

दाखल्याविना विकास रखडल्याच्या बाता खोट्या

लोकमत न्यूज नेटवर्क, मोपा : विद्यमान खासदारांनी इब्रामपूर गावच्या विकासासाठी गाव दत्तक घेतले; पण विकास झालाच नाही. त्याला जमिनीचे ना हरकत दाखले मिळत नसल्याचे सांगण्यात आले; पण मोपा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून जमीन हडप केली, तेव्हा जमीन कशी मिळाली, असा प्रश्न गोवाकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पाटकर यांनी उपस्थित केला.

पाटकर पुढे म्हणाले, पंचवीस वर्षे खासदार असलेल्या खासदाराने म्हादईबाबतच नव्हे, तर केंद्राशी निगडित असलेल्या पेडणे तालुक्यातील एकाही प्रश्नाला वाचा फोडली नाही. मौनी बाबापेक्षा अभ्यासू वृत्तीचा उमेदवार नक्कीच चांगला, असेही ते म्हणाले.

नागझर पेडणे येथील स्वातंत्र्यसैनिक नाना शेट भेंडाळकर सभागृहात आयोजित सभेत पाटकर बोलत होते. यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार अॅड. रमाकांत खलप, आमदार कार्ल्स फेरेरा, डॉ. प्रमोद साळगावकर, बिना नाईक, माजी मंत्री अॅड चंद्रकांत चोडणकर, गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर, आपचे पुंडलिक धारगळकर, मिलाग्रिना फर्नांडिस, पेडणे काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा नाईक, शिवसेनेचे सुभाष केरकर, उत्तर गोवा काँग्रेसचे सरचिटणीस प्रणव परब व इतर मान्यवर मान्यवर उपस्थित होते.

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक आणि हळदोणेचे आमदार अॅड. कार्लस फेरेरा म्हणाले, सत्ता तुमच्याकडे आहे, खासदाराकडे नाही. मतदान केल्यास खासदाराला हा अधिकार द्या. खलप हे खरे सिंह आहेत, ते जनतेचा आवाज लोकसभेत पोहोचवतील, असेही फेरेरा म्हणाले. डॉ. प्रमोद साळगावकर, बिना नाईक, अॅड. जितेंद्र गावकर, प्रणव परब, गोवा फॉरवर्डचे दीपक कळंगुटकर, आम आदमीचे पुंडलिक धारगळकर, जगन्नाथ नाईक देसाई, प्रणव परब या सर्वांनी उपस्थितांना भाषणातून मार्गदर्शन केले. मिलाग्रीन फर्नांडिस, कृष्णा नाईक आदींनी मान्यवरांना पुष्पगुच्छ दिले. सखाराम परब यांनी सूत्रसंचालन केले. कृष्णा नाईक यांनी आभार मानले.

भूमिपुत्रांची दिशाभूल

सरकारच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आणि येथील युवकांना नोकऱ्याही मिळल्या नाहीत. मात्र परराज्यातील लोकांना नोकऱ्या मिळाल्या. यापुढे विमानतळ चालवणाऱ्या कंपनीस स्थानिकांना नोकऱ्या देण्यास भाग पाडू, असा इशारा यावेळी देण्यात आला. तसेच महामार्ग बनविनाता अनेक त्रुटी आहेत. त्यात सुधारणा घडवून आणली जाईल. आराखड्यात बदल केला जाईल. यावेळी उपस्थीतांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. यावेळी मोठ्या संख्येने पेडणे तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

भूमिपुत्र, बेरोजगारांची दिशाभूल केली : खलप

मोपा पठारावर जेव्हा बॉक्साइट खाण सुरू केली, तर त्यामुळे सर्व उद्ध्वस्त होणार म्हणून त्याला आम्ही प्रखरपणे विरोध केला. मोपा विमानतळ व आयुष इस्पितळात युवकांना रोजगार मिळणार, अशी आशा होती. पण, सरकारच्या अनास्थेमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आणि येथील युवकांना नोकऱ्याही मिळल्या नाहीत. मात्र, परराज्यातील लोकांना नोकऱ्या मिळाल्या. चार पदरी महामार्गावर आवश्यक ठिकाणी उड्डाण पूल, भूमिगत रस्ते न ठेवल्याने कित्येक बळी जात आहेत. महामार्गाने प्रवास करताना कंबरडे मोडते, याकडे अॅड. रमाकांत खलप यांनी लक्ष वेधले. पेडणे तालुक्याशी माझे जवळचे संबंध असून पेडणे माझ्या हृदयात आहे, असे उद्‌गार खलप यांनी काढले.

 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसnorth-goa-pcउत्तर गोवा