शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राणे दाम्पत्यामुळे घर साकारले; च्यारी कुटुंबीयांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2024 11:54 IST

गणरायाचेही केले नवीन घरात पूजन

लोकमत न्यूज नेटवर्क, नगरगाव : सत्तरीची जनता म्हणजे राणे यांचे कुटुंबीयच. माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी बरीच वर्षे सत्तरीचे प्रतिनिधित्व केले. पुढे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनसेवेचे व्रत विद्यमान आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व आमदार डॉ. दिव्या राणे हे सध्या सत्तरी तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात. विविध व्यासपीठावरून त्यांनी सतरीची जनता म्हणजे आपले कुटुंबीय असल्याचे वक्तव्य केले आहे. पण, हे वक्तव्य त्यांनी व्यासपीठापुरते मर्यादित न ठेवता आपल्या कृतीतून प्रत्यक्षात उतरविले आहे. सत्तरीतील तमाम गरजवंत व गरीब कुटुंबांना नेहमीच आपल्या मदतीचा हात देऊन आपले वक्तव्य खरे केले आहे.

आंबेडे नगरगाव येथील ज्ञानेश्वर शंकर चारी यांचे घर मागील वर्षीच्या पावसात कोसळले होते. आर्थिक परिस्थिती योग्य नसल्याने घर बांधण्यास जमले नाही. त्यामुळे ते झोपडी बांधून राहत होते. मुलांचे शिक्षण यांचा भार त्यांना पेलवत नव्हता. त्यामुळे नूतन घराचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले होते.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्यापर्यंत त्यांची ही व्यथा पोहोचली व त्यांनी मदतकार्य केले व ज्ञानेश्वर च्यारी यांना चिरेबंदी घर पूर्णत्वास गेल्याबद्दल च्यारी कुटुंबीयांनी राणे कुटुंबीयांना धन्यवाद दिले. नुकताच त्यांच्या भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीला गृहप्रवेश केला. नवीन घरात गणपतीचे पूजनही केले. राणे कुटुंबीयांसाठी गणरायाच्या चरणी उदंड आयुष्य, आरोग्याची प्रार्थना च्यारी कुटुंबीयांनी केली.

सत्तरीची जनता म्हणजे आमचे कुटुंबच आहे आणि त्यांच्या सुख- दुःखात आम्ही नेहमीच सहभागी होत राहणार. सर्वसामान्यांची सेवा, गरजवंतांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे भाग्य आम्हाला मिळू दे. यापुढे आम्ही सत्तरीच्या जनतेसोबत राहू. लोकसेवा करण्याच्या आमच्या कर्तव्यात कसल्याही प्रकारची कसूर ठेवणार नाही. डॉ. दिव्या राणे, आमदार, पर्ये मतदारसंघ.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा