शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अर्जांवर दीनदयाळ उपाध्याय यांची छबी असलेला होलोग्राम, काँग्रेसचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2018 13:34 IST

गोव्यात सरकारी अर्जांवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची छबी असलेला होलोग्राम छापल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी त्यास जोरदार हरकत घेतली असून हा होलोग्राम काढून टाकावा, अशी मागणी केली आहे.

पणजी : गोव्यात सरकारी अर्जांवर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची छबी असलेला होलोग्राम छापल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी त्यास जोरदार हरकत घेतली असून हा होलोग्राम काढून टाकावा, अशी मागणी केली आहे.पत्रकार परिषदेत शांताराम नाईक म्हणाले की, पंडित दीनदयाळ उपाध्याय लोकशाहीविरोधी होते. त्यांनी भारताच्या मुक्तीलढ्याला विरोध केला होता. ते कट्टर जातीयवादी होते. सरकारी अर्जांवर अशा व्यक्तीची छबी म्हणजे लोकशाहीचा आणि देशाच्या मुक्ती लढ्याचा अपमान आहे. शांताराम यांनी असाही आरोप केला की, पंडित दीनदयाळ यांनी त्यावेळी असे म्हटले होते की 'मुस्लिम आणि ख्रिस्ती लोकांनी त्यांचे  स्वतंत्र अस्तित्व विसरावे  आणि  हिंदू रितीरिवाजानुसार  या देशात  गुलाम म्हणून राहावे.' अशा अशा व्यक्तीची पूजा करणे गैर आहे. एका काँग्रेस कार्यकर्त्याने वाळू उपशासाठी खाण खात्यात अर्ज केला असता त्या अर्जावर  उपाध्याय यांची  छबी असलेला होलोग्राम आढळून आला. पत्रकार परिषदेसाठी हा कार्यकर्ता उपस्थित होता. त्याने हा अर्ज पत्रकारांना दाखवला. सरकारच्या अन्य योजनांसाठी असलेल्या अर्जावरही अशाच पद्धतीचे उपाध्याय यांची छबी असलेले होलोग्राम  असल्याचे आढळून आले आहे, असे शांताराम यांनी सांगितले.दरम्यान, उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक आणि डेटा एंट्री ऑपरेटर यांची भरती चालली आहे त्यात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप शांताराम यांनी केला असून दक्षता खात्याने या प्रकरणाची स्वेच्छा दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात 40 कनिष्ठ लिपिक आणि 24 डेटा एंट्री ऑपरेटर जागा दोन ते 10 महिन्यांच्या कालावधीसाठी भरण्यात येत आहेत त्यासाठी युवक युवतींनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. या भरतीत मोठा भ्रष्टाचार चालला असून 20 लाख रुपयांप्रमाणे पर्यंत दर चालला आहे, असा आरोप शांताराम यांनी केला. एक तर हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी स्वतः चौकशीसाठी दक्षता खात्याकडे सोपवावे किंवा दक्षता खात्याने याची स्वेच्छा दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे

दरम्यान राज्यात नारळाचे दर वाढल्याने महिला काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला नावे ठेवून हेटाळणी केल्याबद्दल मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा समाचार घेतला आहे. एकीकडे मोदी सरकार स्टार्ट अप योजनेंतर्गत महिलांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देते तर दुसरीकडे पर्रिकर महिला उद्योजकांची हेटाळणी करतात, असा आरोप शांताराम यांनी केला. महिला काँग्रेसची केलेली हेटाळणी म्हणजे टाळणे मोदी यांच्या धोरणाचा अपमान आहे असे ते म्हणाले.