शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

हिस्ट्रीशीटर सूर्या कांबळीवर प्राणघातक हल्ला, आयसीयूत केले दाखल, हल्लेखोरांचा शोध सुरू

By वासुदेव.पागी | Updated: December 12, 2023 15:24 IST

Goa Crime News: गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेला  सूर्यकांत कांबळी ऊर्फ सूर्या याच्यावर सोमवारी रात्री करंझळे येथे अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून जबर जखमी केले आहे.

- वासुदेव पागीपणजी - गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेला  सूर्यकांत कांबळी ऊर्फ सूर्या याच्यावर सोमवारी रात्री करंझळे येथे अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून जबर जखमी केले आहे. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.  ही घटना सोमवारी  उशिरा घडली. तो घरी जात असताना त्याला अडवून त्याच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्याच्याा शरिरावर धारधार शस्त्रांचे घाव आढळले असून बराच रक्तस्त्रावही झाला आहे. त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. गोमेकॉत अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती गोमेकॉच्या सूत्रांकडून देण्यात आली.

सूर्या हा गुन्हेगारी कृत्यांसाठी ओळखला जातो. पेडणे, पणजी, डिचोली, कळंगूट आणि साळगाव पोलीस स्थाकात त्याच्या विरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यात धमकी देणे, खुनी हल्ला करणे, बेकायदा शस्त्रे बाळगणे व इतर गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्या या गैरकृत्यांमुळे अनेक गुन्हेगारांच्या हीटलीस्टवरही तो होता. अनेकांचा त्याच्यावर रागही होता. त्याच्यावरील सोमवारी झालेला हल्ला हा त्याचाच परिणाम असण्याची शक्यता पणजी पोलीस नाकारीत नाहीत. पणजी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. 

दरम्यान सर्राईत गुन्हेगारांनाच लक्ष्य करून खून करण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. जुने गोवा पोलीस स्थानाच्या कार्यक्षेत्रात झालेला विशाल गोलतकर याचा खून ही अलिकडील घटना आहे. गोलतकर याचा खूनही त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळेच त्याच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आल्याचे नंतर तपासातून आढळून आले आहे. सूर्यावर हल्ला ही तसलाच प्रकार असण्याची शक्यता व्यत्त केली जात आहे.

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी