शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

गोव्यातील वारसास्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी लवकरच वारसा महोत्सव - बाबू कवळेकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 17:41 IST

गोव्यातील पुरातत्व खात्यातर्फे जे दस्तावेज आहेत त्यांचे  इंग्रजी भाषेत भाषांतर करुन ते डिजिटीलायझेशन पद्धतीने सांभाळून ठेवले जातील.

मडगाव - गोव्यातील ऐतिहासिक वारसास्थळांचे संवर्धन हाती घेण्याची योजना राज्य सरकारने तयार केली असून या ऐतिहासिक स्थळांकडे पर्यटक व लोकांना आकर्षित करण्यासाठी लवकरच मोठ्या प्रमाणावर ‘वारसा महोत्सवाचे’ आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्व खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी गुरुवारी दिली.

गोवा मुक्ती दिनानिमित्त गुरुवारी मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सोहळ्यात झेंडावंदन केल्यानंतर बोलताना कवळेकर यांनी ही माहिती दिली. गोव्यातील पुरातत्व खात्यातर्फे जे दस्तावेज आहेत त्यांचे  इंग्रजी भाषेत भाषांतर करुन ते डिजिटीलायझेशन पद्धतीने सांभाळून ठेवले जातील. दक्षिण गोव्यातील लोकांना हे दस्तावेज उपलब्ध व्हावेत यासाठी केपे येथे पुरातत्व खात्याचे कार्यालय उघडले जाईल असे त्यांनी सांगितले.कवळेकर यांच्याकडे शेती खातेही असून या खात्यामार्फत गोव्यात सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले जाईल असे सांगतानाच हे काम अंतिम टप्प्यावर पोचले आहे. युवकांनी शेतीकडे आकर्षित व्हावे यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच शेती व्यवसायाची पर्यटनाशी जोड घालण्याची योजनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कारखान्यात काम करणा:या कामगारांच्या सुरक्षेसाठी गोव्यातील सर्व कारखाने, कारखाने व बाष्पक कायद्याखाली नोंद केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.सुरुवातीला कवळेकर यांनी लोहिया मैदानावरील लोहियांच्या पुतळ्याला फुले अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या संचलनाची पहाणी केली. यावेळी आमदार चर्चिल आलेमाव, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, विल्फ्रेड डिसा, क्लाफासियो डायस, माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो, मडगावच्या नगराध्यक्ष पूजा नाईक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यापूर्वी सकाळी कवळेकर यांनी आपल्या बेतूल येथील निवासस्थानी झेंडावंदन केले.

टॅग्स :goaगोवाtourismपर्यटन