शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मगोपाच्या वादग्रस्त याचिकेवर सोमवारी सुनावणी, भाजपाचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 12:20 IST

मगो पक्षाने सत्तेत राहूनही भाजपाच्या दोन नेत्यांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयास जी अपात्रता याचिका सादर केली आहे, त्यावर पहिली सुनावणी येत्या सोमवारी (26 नोव्हेंबर)होणार आहे. सत्ताधारी भाजपाचे बारीक लक्ष त्याकडे लागून आहे.

पणजी : मगो पक्षाने सत्तेत राहूनही भाजपाच्या दोन नेत्यांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयास जी अपात्रता याचिका सादर केली आहे, त्यावर पहिली सुनावणी येत्या सोमवारी (26 नोव्हेंबर)होणार आहे. सत्ताधारी भाजपाचे बारीक लक्ष त्याकडे लागून आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी आघाडीचे मगोपा व गोवा फॉरवर्ड हे दोन प्रमुख घटक पक्ष आहेत. सरकारचा सगळा भार ह्या दोन पक्षांवर व अपक्षांवर अवलंबून आहे. अलिकडेच काँग्रेसचे दोन आमदार पक्षाचा व आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपामध्ये दाखल झाले.

यापुढे होणा-या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये हे दोघे फुटीर भाजपाचे उमेदवार असतील. मगोपने या दोघांविरुद्ध थेट न्यायालयात याचिका सादर करून सरकारमध्ये व भाजपामध्येही खळबळ उडवून दिली. सरकारमध्ये अस्वस्थता निर्माण करावी या हेतूने मगोपाने ही चाल खेळली, अशी टीका नुकतीच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी केली. ही याचिका मागे घ्यावी अशी विनंती आम्ही मगोपाला करणार नाही पण न्यायालयात त्यांना उत्तर देऊ, असेही तेंडुलकर म्हणाले. 

मगोपाने केंद्रीय निवडणूक आयोगाला व मुख्य निवडणूक अधिका-यांनाही याचिकेत प्रतिवादी केले आहे. दयानंद सोपटे व सुभाष शिरोडकर यांनी गेल्या महिन्यात आमदारकीचा राजीनामा दिला. दिल्लीहून या दोघांनी राजीनामा पाठवून देणे व सभापतींनी तो गोव्यात लगेच स्वीकारणे हे मगोपाला मान्य नाही. यामुळे सभापतींच्या निर्णयालाही मगोपाने आव्हान दिले आहे. गोव्यातील काही सामाजिक कार्यकर्तेही आता याचप्रकारे न्यायालयात भाजपाच्या या दोघा संभाव्य उमेदवारांविरुद्ध याचिका सादर करू पाहत आहे. या दोघांनाही पोटनिवडणुका लढविण्यापासून निवडणूक आयोगाने रोखावे अशी मगोपची भूमिका आहे. येत्या सोमवारी ही याचिका सुनावणीस येईल तेव्हा काही प्रमाणात या याचिकेचे भवितव्य ठरेल, असे राजकीय गोटात मानले जात आहे. 

दरम्यान, ही याचिका आम्ही सरकारविरुद्ध किंवा भाजपाविरुद्ध सादर केलेली नाही तर पक्षांतरांना आळा बसावा व फुटाफुटीचे राजकारण बंद व्हावे या हेतूने सादर केली आहे, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी सांगितले. भाजपला मात्र हा युक्तीवाद मान्य नाही.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा