शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

अविश्वास ठरावावर ३१पूर्वी बैठक घ्या!

By admin | Updated: October 14, 2014 01:44 IST

पणजी : गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला ३१ आॅक्टोबरपर्यंत बैठक घेऊन अविश्वास ठरावाचा सोक्षमोक्ष लावण्याचा

पणजी : गोवा राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळाला ३१ आॅक्टोबरपर्यंत बैठक घेऊन अविश्वास ठरावाचा सोक्षमोक्ष लावण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने दिला आहे. गोवा राज्य सहकारी मंडळाचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांच्याविरुद्धच्या अविश्वास ठरावप्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. या सुनावणीत खंडपीठाने ३१ आॅक्टोबरपूर्वी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बोलावून या ठरावावर निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. या आदेशामुळे मंडळाला नव्याने ठरावावर मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे अविश्वास ठराव बारगळल्याचा उल्हास फळदेसाई यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाचा दावा फोल ठरला आहे. विश्वास सिद्ध करण्यासाठी त्यांना १८ दिवसांत संचालक मंडळाची बैठक बोलावून संख्याबळ सिद्ध करावे लागणार आहे. फुटलेल्या विरोधी सदस्यांनी आपला पाठिंबा विद्यमान अध्यक्षांनाच असल्याची प्रतिज्ञापत्रे सादर केल्यामुळे आणखी अविश्वास ठरावावर विचार करण्याचा प्रश्नच येत नसल्याचा दावा सत्ताधारी गटाने केला आहे; परंतु विश्वास सिद्ध झाल्याशिवाय फळदेसाई यांना अध्यक्षपदी राहता येणार नाही, असा दावा रामचंद्र मुळे यांच्या नेतृत्वाखालील विरोधी गटाने केला आहे.