शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हणजूणमधील कुंटणखान्यावर धाड; चार युवतींची सुटका, सहा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 17:12 IST

हणजूण पोलिसांनी वेश्या व्यवसाय विरोधी केलेल्या कारवाईत गुमालवाडो-हणजूण येथे सुरू असलेला कुंटणखाना धाड टाकून उध्वस्त केला. या कारवाईत तीन महिला दलालासह सहा जणांना अटक करून चार युवतींची सुटका करण्यात आली.

म्हापसा : हणजूण पोलिसांनी वेश्या व्यवसाय विरोधी केलेल्या कारवाईत गुमालवाडो-हणजूण येथे सुरू असलेला कुंटणखाना धाड टाकून उध्वस्त केला. या कारवाईत तीन महिला दलालासह सहा जणांना अटक करून चार युवतींची सुटका करण्यात आली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे. 

हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक चेतन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गुमालवाडो-हणजूण येथे वेश्या व्यवसाय भाड्याच्या खोलीत होत असल्याची खबर मिळाल्यानंतर दि. २७ रोजी रात्री ८.३० वा. निरीक्षक चेतन पाटील यांनी उपनिरीक्षक विश्वजित चोडणकर, हरिष वायंगणकर,  विशाल मांद्रेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा पेडणेकर, कॉन्स्टेबल अनंत च्यारी, सुहास जोशी, विशाल नाईक, सत्येंद्र नास्रोडकर, प्रवीण पाटील, विनायक पालव, महिला पोलीस प्रतिज्ञा नाईक, श्वेता परब यांच्यासह त्या ठिकाणी धाड टाकली. त्यावेळी तेथील चार खोल्यात चार युवती चार गिºहाईकांसोबत सापडल्या. हणजूण पोलिसांनी नेरूळ-ठाणे, अंधेरी मुंबई व मध्यप्रदेश येथील त्या चारही पिडीत युवतींची सुटका करून त्यांची रवानगी महिला सुधारगृहात केली. तर या युवतींना वेश्या व्यवसायासाठी आणून त्यांच्या जिवावर जगणाºया साईश शांताराम खरंगे (३३, रा. राजस्थान), शिनाझ सलीम खाजो (३७, रा. सांगली) व उज्वला महादेव कांबळे (३६, रा. सांगली) या कुंटणखाना चालवणाºया तिघा महिला दलाला विरूद्ध वेश्या व्यवसाय विरोधी गुन्ह्याखाली अटक करण्यात आली. तसेच या कुंटणखाण्यात गिºहाईक म्हणून गेलेल्या मणी विरा वानन (२५, रा. पर्वरी), अमित जमालप्पा लमाणी (२०, रा. बागा कळंगुट), अल्ताफ बाबाजान खतीब (२५, रा. टिटोवाडा नेरूळ) व अन्य एक अल्पवयीन अशा चौघाना अटक करण्यात आली आहे. 

भाड्याच्या खोलीत चालणारा हा कुंटणखाना बाजूला असल्याने सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. रात्रीच्यावेळी रोजंदारीवरील मजूर कामगार असे लोक या ठिकाणी येत असतात. पंधरा दिवसापूर्वी संशयावरून हणजूण पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली होती त्यावेळी तेथे असलेल्या पुरूष व स्त्रिने नवरा-बायको असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांना सी-फॉर्म भरावयास सांगण्यात आला होता तो त्यांनी सादर केला होता. एकदा पोलीस येऊन गेल्याने त्यांनी कुंटणखान्यास बिनधास्त सुरुवात केली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी