शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोमेकॉत दलालांना रोखण्यास पोलिसांचा वापर करणार, सिंधुदुर्गातील रुग्णांना शुल्कातून सवलत नाहीच - विश्वजित राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 21:06 IST

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाच्या (गोमेकॉ)काही विभागांमध्ये रुग्णांना टोकनची विक्री करणारे दलाल वावरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पोलिस अधीक्षकांना आपण याविषयी सतर्क केले आहे. दलालांविरुद्ध कारवाई करण्यासाठी

पणजी - बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळाच्या (गोमेकॉ)काही विभागांमध्ये रुग्णांना टोकनची विक्री करणारे दलाल वावरत असल्याच्या तक्रारी येत आहेत. पोलिस अधीक्षकांना आपण याविषयी सतर्क केले आहे. दलालांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गोमेकॉत पोलिसांची सुरक्षा ठेवण्याचा विचार आहे. सिंधुदुर्गमधील रुग्णांना शुल्कातून सवलत मिळणार नाही, पण जे रुग्ण गरीब असतात त्यांना शूल्क माफ करण्याचा अधिकार आम्ही गोमेकॉच्या वरिष्ठ अधिका-यांना दिला आहे. असे आरोग्य मंत्री विश्वजित राणो यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. 

गोमेकॉत कितीही सुधारणा केल्या तरी, काही अपप्रवृत्ती स्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. नेमके कोणते दलाल टोकनची विक्री करतात ते अजून स्पष्ट झालेले नाही. आपण एके दिवशी भल्या पहाटे पोलिसांना घेऊन गोमेकॉ इस्पितळाला भेट देईन. तिथे पोलिसांचा पहाराही ठेवला जाईल. गोमेकॉत अजुनही काहीजण कोंबडे सोडण्याचे प्रकार करतात. अशांविरुद्धही यापुढे कारवाई केली जाईल, असे मंत्री राणो म्हणाले. गोमेकॉत विदेशी रुग्णांसाठी शूल्कवाढ करण्याचा आमचा विचार आहे. सध्या 2क् टक्के शूल्क आकारले जाते. ते विदेशी रुग्णांसाठी 5क् टक्के केले जाईल. पर्यटक म्हणून जे विदेशी गोव्यात येतात. त्यांना 5क् टक्के शूल्क देणो परवडेल, असे राणो म्हणाले. गोमेकॉ इस्पितळात आज बुधवारी सकाळी इन-हाऊस फार्मसी सुरू केली जाईल. या फार्मसीमुळे सर्व औषधे उपलब्ध होतील. शिवाय विविध प्रकारच्या उपचारांसाठी स्टील रॉड्स वगैरेही येथेच उपलब्ध केले जातील. रुग्णाला बाहेरून काहीच आणावे लागू नये असे ते म्हणाले.

महाराष्ट्राशी करार  

गोमेकॉमध्ये परप्रांतीय रुग्णांना शूल्क लागू झाल्यामुळे गोमेकॉचे उत्पन्न वाढले आहे. सिंधुदुर्गमधील रुग्णांना शुल्कातून सवलत मिळणार नाही, पण जे रुग्ण गरीब असतात त्यांना शूल्क माफ करण्याचा अधिकार आम्ही गोमेकॉच्या वरिष्ठ अधिका-यांना दिला आहे. सिंधुदुर्गमधील रुग्णांवर येणारा खर्च म्हणून दोन कोटी रुपये गोमेकॉला देण्याचे साधे पत्र महाराष्ट्राने पाठवले आहे. केवळ पत्रने काही होणार नाही. करार करता येईल. आमची करार करण्याची तयारी आहे. 30 टक्के परप्रांतीय रुग्ण गोमेकॉत येतात. सिंधुदुर्गमधील रुग्णांविषयी चर्चा करण्यासाठी आपण आज बुधवारी दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना भेटणार आहे. शूल्क मागे घेतले जाणार नाही पण गोव्यातील इस्पितळे इम्पेनल्ड करणे किंवा अन्य तत्सम तोडगा काढण्याच्यादृष्टीने करार करता येईल. सावंतवाडी व अन्य भागांतील जे रुग्ण अपघात झाल्यानंतर गोमेकॉत येतात त्यांच्यावर तातडीने उपचार केले जातात, असे राणे यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाhospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग