शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात सांस्कृतिक पर्यटनासाठी जीटीडीसीचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 19:47 IST

आग्वाद येथील किल्ल्याच्या ठिकाणी साऊंड आणि लाईट शो तूर्त करता येणार नाही याची जाणीव झाल्यानंतर गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) बागा येथील समुद्रकिना-याजवळ साऊंड व लाईट शो आयोजित करण्याचे ठरविले आहे.

पणजी : आग्वाद येथील किल्ल्याच्या ठिकाणी साऊंड आणि लाईट शो तूर्त करता येणार नाही याची जाणीव झाल्यानंतर गोवा पर्यटन विकास महामंडळाने (जीटीडीसी) बागा येथील समुद्रकिना-याजवळ साऊंड व लाईट शो आयोजित करण्याचे ठरविले आहे. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे गोव्यात सांस्कृतिक पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, असे महामंडळाच्या वरिष्ठ अधिका-यांचे म्हणणे आहे.

बागा येथील समुद्रकिना-याजवळ जिथे वाहन पार्किंगसाठी जागा आहे, तेथील जागेवर स्टेज उभी केली जाईल. तिथे लाईट शो होईल. त्याचबरोबर गोव्याच्या लोककला, गोव्याची संस्कृती, गोव्याचा वारसा याचे दर्शन घडविणारे उपक्रमही तिथे होतील. म्हणजेच तो निव्वळ साऊंड व लाईट शो नसेल. गोवा मुक्तीसंग्रामाचीही माहिती तेथील उपक्रमांमधून दिली जाईल. मुक्ती लढय़ातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची व कर्तृत्वाची गाथाही सांगितली जाईल. पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई यांनी  शनिवारी येथे लोकमतशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. बागाचा साऊंड व लाईट शो हा तिकीट शो असेल. प्रेक्षक तिकीट खरेदी करून तिथे येतील. राज्यात सांस्कृतिक पर्यटन अशा प्रकारच्या उपक्रमांमुळेच वाढीस लागेल, असे देसाई म्हणाले.

आग्वाद किल्ल्यावर साऊंड व लाईट शो आयोजित करण्याची अगोदर पर्यटन महामंडळाची योजना होती पण तिथे जीसीङोडएमएसह पुरातत्त्व खाते व अन्य अनेक यंत्रणांची परवानगी तथा ना हरकत दाखले घ्यावे लागतात. नॅशनल मोनुमेन्ट्स अथोरिटीची मान्यता अजून मिळालेली नाही. ती मान्यता प्राप्त करून मग साऊंड शो सुरू करण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी लागेल. त्यामुळे तूर्त बागा येथेच शो सुरू करण्यावर महामंडळाच्या संचालक मंडळानेही शिक्कामोर्तब केले. प्राथमिक काम सुरू झाले आहे. न्यूव लिग या कंपनीला कंत्रट मिळाले आहे.

टॅग्स :goaगोवा