शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणेत गिरीश चोडणकर यांना हिरवा कंदील? चोडणकर यांच्या प्रचारार्थ गाठीभेटी सुरू

By वासुदेव.पागी | Updated: March 30, 2024 15:54 IST

इच्छुक उमेदवारांच्या यादीत उत्तरेत रमाकांत खलप, सुनील कवठणकर आणि विजय भिके तर दक्षिणेत विद्यमान खासदार फ्रांसिस सार्दीन, गिरीश चोडणकर आणि विरियाटो फर्नांडीस यांची नावे आहेत आणि उमेदवारीच्या बाबतीत मतैक्य न झाल्यामुळे अद्याप कुणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

पणजीः लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांसंबंधीचा गुंता सुटला नसल्यामुळे अद्याप उमेदवारांची नावे जाहीर केली नसली तरी दक्षिण गोव्यात गिरीश चोडणकर यांना हायकमांडकडून हिरवा कंदील दाखविण्यात आल्याचे संकेत आहेत. कारण चोडणकर यांनी प्रचार दौरे सुरू केले आहेत.

इच्छुक उमेदवारांच्या यादीत उत्तरेत रमाकांत खलप, सुनील कवठणकर आणि विजय भिके तर दक्षिणेत विद्यमान खासदार फ्रांसिस सार्दीन, गिरीश चोडणकर आणि विरियाटो फर्नांडीस यांची नावे आहेत आणि उमेदवारीच्या बाबतीत मतैक्य न झाल्यामुळे अद्याप कुणाचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही. या पार्श्वभुमीवर गिरीशचोडणकर यांनी शुक्रवारपासून गाठीभेटी सुरू केल्या आहेत.  कार्यकर्त्यांना भेटणे तसेच मतदारांनाही भेटणे त्यांनी सुरू केले आहे. तुम्हाला उमेदवारी देण्याचे आश्वासन हायकमांडने दिले आहे काय असे विचारले असता त्यांनी याचे थेट उत्तर न देता आपण उमेदवारीच्या बाबतीत फार सकारात्मक असल्याचे सांगितले. शिवाय ते शनिवारी मडगावात व इतर ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असल्याचेही दिसून आले आहे. यामुळे उमेदवारीची माळ ही त्यांच्याच गळ्यात पडणार असल्याचे तसेच त्यांना याची माहिती हायकमांडने दिली असल्याचे निष्कर्ष काढले जात आहेत. तसे स्पष्ट संकेतही मिळत आहेत.

दक्षिण गोव्यातील विद्यामान खासदार   फ्रांसीस सार्दीन हे पुन्हा मतदारांच्या भेटीला कधी गेलेच नाहीत असे लोक सांगताहेत. त्यामुळे तुम्हाला कॉंग्रेसचा उमेदवार म्हणून लोकांपुढे जाताना अडचण होणार नाही काय असे विचारले असता त्यांनी खासदार सार्दीन यांनी लोकांची कामे केली आहेत असे सांगितले. लोकसभेत त्यांनी मतदारसंघातील समस्या मांडल्या आहेत. त्यांनी केवळ आपल्या कामांची प्रसिद्धी केली नाही असेही ते म्हणाले.

दरम्यान उत्तर गोवा मतदारसंघात रमाकांत खलप यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा असली तरी उत्तरेत तरी कुणी कॉंग्रेसचे इच्छुक उमेदवार थेट प्रचाराला लागले असे चित्र कुणी पाहिले नाही.  दोन्ही जिल्ह्यातील उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा ही ३१ मार्च रोजी केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४goaगोवा